सुनील पाटलांचा मोठा गैाप्यस्फोट ; 'भानुशालींनी मला मारहाण केली'

''मनिष (manish bhanushali) आणि धवल भानुशाली यांनी मला जबर मारहाण केली, जीवे मारण्याची धमकीही दिली,'' असा गंभीर आरोप सुनील पाटील (sunil patil) यांनी केला आहे.
sunil patil
sunil patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), सुनील पाटील (sunil patil) यांनी एनसीबीला बदनाम करण्याचे काम हाती घेऊन शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोपही भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला. या प्रकरणात रोज नवी खुलासे होत असल्याने या प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे. मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर सुनील पाटील यांनी गैाप्यस्फोट केला आहे. त्यांच्यावरील आरोपांचे त्यांनी खंडन केलं आहे.

''मनिष (manish bhanushali) आणि धवल भानुशाली यांनी मला पाच-सहा दिवसांपूर्वी दिल्लीत बोलावून घेतलं होतं. मी दिल्लीत गेल्यावर या दोघांनीही मला जबर मारहाण केली, जीवे मारण्याची धमकीही दिली,'' असा गंभीर आरोप सुनील पाटील (sunil patil) यांनी केला आहे. सुनील पाटील माध्यमांसमोर बोलत होते. ते म्हणाले, ''मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. अहमदाबादेत मी थांबलो होतो. मी या प्रकरणाचा मास्टरमाइंड नाही,''

''पाच-सहा दिवसापूर्वी मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो होतो, याठिकाणी मनीष आणि धवल भानुशाली यांनी मला पहिल्या दिवशी धमकी देऊन मारहाण केली. दिल्लीतून गेला तर मारुन टाकू, आम्ही नेत्यांना भेटणार आहोत, तू यांना एक्सपोज कर, असं त्यांनी मला धमकावलं. मी कशाला कुणाला एक्सपोज करु, जे सत्य आहे ते सांगा असं त्या दोघांना सांगितलं,'' असे पाटील म्हणाले.

सुनिल पाटील म्हणाले, ''या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या प्रकरणात मला फसवलं गेलं. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. मी सह्याद्री अतिथीगृहात गेलो की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज काढून तपासा.''

sunil patil
सहकारमंत्रीच एफआरपी कायद्याचे भक्षक ; राजू शेट्टींचा हल्लाबोल

''मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं,'' असे सुनील पाटील यांनी सांगितलं.

''कंबोज यांनी ऋषिकेश देशमुख यांचं नाव घेतलं. ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध असल्याचं सांगितलं. पण मी ऋषी देशमुखला ओळखत नाही. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं. बनावट रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही,'' असे त्यांनी सांगितलं.

''मोहित कंबोज यांना सांगा मी दारू पीतच नाही. मी चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथे राहत होतो. कारण गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला घर नव्हते. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. मी जर बदल्यांचं रॅकेट चालवतोय तर माझ्याकडे किमान 100 कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास करा '' असे स्पष्टीकरण पाटील यांनी केलं आहे.

मुंबईत अमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात एनसीबीच्या (NCB) कारवाया आणि काही अधिकाऱ्यांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान (Nilopher Malik Khan) हिने सोशल मीडियावर लिहिलेल्या खुल्या पत्राची शनिवारी चर्चा होती.

निलोफर हिचे पती समीर खान (Sameer Khan) यांना एनसीबीने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जानेवारीत अटक केली होती. सप्टेंबर महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली. जामीन देताना कोर्टाने खान यांच्याकडे सापडलेला पदार्थ हा गांजा नसून हर्बल तंबाखू असल्याचे निरिक्षण नोंदवले होते. त्या पार्श्वभूमीवर पतीच्या अटकेनंतर निलोफर यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा भावनीक तपशील या पत्रातून मांडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com