Manisha Awhale : ...अखेर उल्हासनगरच्या महापालिका आयुक्त पदाचा सस्पेन्स संपला; मनिषा आव्हाळे यांनी स्वीकारला पदभार!

Ulhasnagar Municipal Commissioner : उल्हासनगरचे आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह सचिव म्हणून नियुक्ती झाल्यावर आयुक्तांचे पद रिक्त होते.
Manisha Awhale
Manisha AwhaleSarkarnama
Published on
Updated on

Manisha Awhale Ulhasnagar Municipal Commissioner : विदर्भ कन्या मनिषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदभार स्वीकारला आहे. त्या विदर्भातील वाशिम जिल्ह्यामधील मंगरूळपीर तालुका सायखेडा गावातील आहेत. आयएएस अधिकारी झाल्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून काम करताना अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. तर पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या शहरी विकासाला गती मिळाली होती. .

विशेष म्हणजे आता आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच बैठकीत एचओडी विभाग प्रमुखांना आयुक्तांकडील बैठकीमध्ये मोबाईलवर एसएमएस किंवा कॉलिंग करू नये अशी खरमरीत तंबी दिली आहे.

Manisha Awhale
Kolkata rape case update : अखेर कोलकात्याच्या ‘निर्भया’ला न्याय मिळाला; आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी

गुरुवारी 16 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या(Maharashtra Government) सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस मनिषा आव्हाळे यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याचे पत्रक जाहीर केले आणि आयुक्तांचा सस्पेन्स संपुष्टात आला. विशेष म्हणजे 1996 साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आयुक्त पदावर विराजमान होणाऱ्या मनिषा आव्हाळे ह्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

उल्हासनगरचे आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचे सह सचिव म्हणून नियुक्ती झाल्यावर आयुक्तांचे पद रिक्त होते. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे आयुक्तांचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला होता. या स्पर्धेत स्वतः जमीर लेंगरेकर आणि अंबरनाथचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांची नावे चर्चिली जात होती. आयुक्त म्हणून कोण येणार? हा सस्पेन्स आठवड्यापासून कायम होता.

Manisha Awhale
Sunil Tatkare On Uttam Jankar : '...तर तिथं महायुतीचा आमदार निवडून येत असतो'; तटकरेंनी जानकरांना डिवचलं

गुरुवारी नियुक्ती होताच शुक्रवारी 17 जानेवारी रोजी पदभार स्वीकारणाऱ्या मनिषा आव्हाळे यांनी हेड ऑफ डिपार्टमेंट असणाऱ्या एचओडी विभाग प्रमुख अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली. त्यात बैठकीत मोबाईलवर एसएमएस किंवा कॉलिंग करू नये. सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या संचिका थेट आयुक्तांकडे सादर न करता त्या सादरी करनाच्या टप्प्याने सादर कराव्यात. महत्त्वाच्या संचिका 4 दिवस अगोदर सादर कराव्यात व त्यामध्ये पृष्ठ क्रमांक सविस्तर माहिती महत्त्वाच्या कागदपत्रांना पताका लावण्यात याव्यात.

तसेच विभागाच्या पीपीटी सादर करून त्यामध्ये कर्मचारी संख्या,योजनांची माहिती, अडचणी समस्या यांचा समावेश करावा. मासिक/साप्ताहिक नियोजन तयार करावे. व्हाट्सअप ग्रुप वर एका विभागाचे एकच अधिकारी ठेवावेत. ग्रुप वर कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त इतर माहिती पोस्ट करू नये. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. कार्यालयात स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, बैठक व्यवस्था इत्यादी बाबींना प्राधान्य द्यावे.ई ऑफिस अंमलबजावणी पुढील तीन महिन्यात करावी. विशेष शासन निर्णय सादर करून त्यातील महत्त्वाच्या सूचना पाळाव्यात आदी सूचना दिल्या.

या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेंकर,अतिरिक्त आयुक्त,किशोर गवस,उपायुक्त विजय खेडकर, मुख्य लेखाअधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख, शहर अभियंता अभियंता तरुण शेवकानी, अभियांत्रिकी विभागाचे अभियंता हनुमंत खरात, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, कर निर्धारक व संकलक निलम कदम, सिस्टम अनालिस्ट श्रद्धा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, विशाल कदम, सलोनी निवकर, विभाग प्रमुख अंकुश कदम, मनोज जाधव, राजेश घनघाव आदी अधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com