Manoj Jarange: जरांगे पाटलांचं मुंबई मिशन काय आहे? 23 मतदारसंघाबाबत घेतला मोठा निर्णय

Manoj Jarange Patil Mumbai Mission: मुंबईत कुलाबा ते दहीसर असे एकूण 36 मतदारसंघ आहेत. जरांगे पाटील यांनी कोणत्या 23 मतदारसंघांबाबत निर्णय घेतलाय हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. मराठवाड्यात अनेक ठिकाणी जरांगेंचे उमेदवार लढणार आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSatrkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे उमेदवार कोणत्या मतदारसंघातून लढणार यांची यादी त्यांनी वाचून दाखवली. काही मतदारसंघाबाबत आज ते निर्णय घेणार आहेत. मराठवाड्यात 14 विधानसभा मतदारसंघात जरांगेंचे उमेदवार लढणार आहेत. तर काही ठिकाणी जरांगे हे उमेदवार पाडणार आहेत, तर काही ठिकाणी पाठिंबा देणार आहेत.

मुंबईत 36 मतदारसंघ आहेत, यापैकी 23 मतदारसंघात उमेदवार पाडण्याचा मोठा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कारण जरांगेंनी या 23 मतदारसंघात त्यांचे शिलेदार मुंबईत निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत कुलाबा ते दहीसर असे एकूण 36 आमदार आहेत, 36 मतदारसंघ आहेत. त्यामुळे, जरांगे पाटील यांनी कोणत्या 23 मतदारसंघांबाबत निर्णय घेतलाय हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. मराठवाड्यात 14 ठिकाणी जरांगेंचे उमेदवार लढणार आहेत. ते कोणते मतदारसंघ आहेत, हे पाहू यात

येथे निवडणूक लढवणार?

बीड, (बीड जिल्हा)

हिंगोली, (हिंगोली जिल्हा)

केज,(राखीव )(बीड जिल्हा)

हदगाव, (जिल्हा नांदेड)

परतूर, (जालना जिल्हा)

फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)

पाथरी,( परभणी जिल्हा)

Manoj Jarange Patil
Maharashtra Politics: सर्वांत श्रीमंत मंत्री कोण? एकनाथ शिंदे, सावंत, फडणवीस की अजित पवार...

येथे उमेदवार पाडणार

कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)

गंगाखेड, (परभणी जिल्हा)

भोकरदन, (जालना जिल्हा)

गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)

जिंतूर, (परभणी जिल्हा)

औसा-(लातूर जिल्हा)

Manoj Jarange Patil
Congress News : मुख्यमंत्र्यावर अंकुश ठेवणाऱ्या काँग्रेसच्या दोन फायर ब्रँड नेत्या

येथे पाठिंबा देणार?

पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

बदनापूर राखीव जालना जिल्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com