
Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे-पाटील हे आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलकांना कुठलीही सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात आल्या नाहीत. स्वच्छतागृहांची कमतरता, पाणी नाही यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई महापालिकेंच्या आयुक्तांना थेट इशार देत म्हटले की, आयुक्तांना मी सुट्टी देणार नाही.
जरांगेंच्या अवघ्या तीन तासात प्रशासनाकडून आंदोलकांना सुविधा पुरवण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे आंदोलकांना कुठल्या सुविधा पुरवत आहोत याची यादीच मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही, असे देखील सांगितले ाहे.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले की, सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर २ ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला. आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत.आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत.वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे.
- 4 वैद्यकीय पथक आणि २ रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास कार्यरत आहेत.
- १०८ रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध.
- आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध.
- मैदानात आतील बाजूस एकूण २९ शौचालय विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असलेली ३ फिरती शौचालये उपलब्ध.
- मेट्रो साइट शेजारी १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये + अतिरिक्त शौचालयांची सोय.
- फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून २५० शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.
- पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत आहेत.
- इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.