Manoj Jarange Patil : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या जुन्याच मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. यासाठी ते 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात करणार आहेत.
यासाठी जरांगेसंह त्यांचे राज्यभरातील समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. तर मुंबईकडे निघण्यापूर्वी जरांगे यांनी सरकार उलथवण्याचा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता.
शिवाय फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याचा आणि एकनाथ शिंदेंना काही बोलून देत नसल्याचा आरोप देखील जरांगेंनी केला होता. याच सर्व पार्श्वभूमीवर आणि जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भाजप नेत्यांकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजीने करण्यात आली आहे.
या बॅनरबाजीतून त्यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिल्याचं दिसत आहे. जरांगेंच्या मोर्चाला प्रत्युत्तर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर 'इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो'; असं लिहिलं आहे. शिवाय मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते, असाही उल्लेख बॅनवर करण्यात आला आहे.
त्यामुळे भाजपने आता मराठा आमदारांची लॉबी जरांगेंविरोधात उतरवल्याचं बोललं जात आहे. तर ही बॅनरबाजी भाजप आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी केल्याचं दिसत आहे. या नेत्यांची बॅनरवरती नावे असून जरांगेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.