
Rohit Pawar News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन देखील सुरू केले आहे. गोळी घातली तरी मागे हटणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत गृहविभाग दगाफटका करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या ट्विटसोबत एक पत्राचा फोटो देखील शेअर केला आहे.
आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली बंद करण्यासंदर्भातील न्यू मरिन लाईन्सस (स्टाॅल होल्डर्स) खाऊ गल्ली वेलफेअरचे पत्राचा फोटो रोहित पवारांनी शेअर केला आहे. या पत्रात पोलिसांच्या सूचनेप्रमाणे खाऊ गल्ली बंद ठेवावी, असे म्हटले आहे. दरम्यान, खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल, असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला.
मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन देखील रोहित पवारांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.