Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्ठमंडळासोबत उपसमितीची होणारी आजची बैठक रद्द झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
जरांगे पाटील याचं शिष्टमंडळ आले नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत उपसमितीची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ठरलेली होती. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. आणि बैठकीतील निर्णयही जाहीर करण्यात आले आहेत. हे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत....
> मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.
> कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू
> मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार
> न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या. संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार
दरम्यान, मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांनी मुंबईत राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राजभवनाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी आमदारांनी केली आहे. राज्यपाल आम्हाला भेट देत नाहीत, तोपर्यंत आम्ही गेटवरून हलणार नाही. आमचं ठिय्या आंदोलन असंच सुरू राहील, असं मराठा आमदारांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.