Uddhav On Maratha Andolan : ...तर मी शिंदे सरकारसोबत असेन, उद्धव ठाकरे यांनी केले महत्त्वाचे विधान

Uddhav Thackeray On Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला आहे. काही ठिकाणी मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. अजूनही यावर काही मार्ग निघत नाही. मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेतली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एका उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार ) डेंग्यू झालाय, तर दुसरे उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) हे मराठा आणि महाराष्ट्रापेक्षा भाजपचा प्रचार करायला रायपूरला गेले. महाराष्ट्र जळत असताना, तरुण रस्त्यावर उतरले असताना पक्षाचा आणि दुसऱ्या राज्याचा प्रचार महत्त्वाचा वाटतो. असे लोक समाजाला न्याय देऊ शकतील का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maratha Reservation News : शिंदे गटाच्या खासदारांना जरांगे पाटलांचं नावच माहिती नाही अन् म्हणतात 'मी राजीनामा देईन...'

जरांगे पाटील यांना पुन्हा विनंती करतो. कृपा करून टोकाचं पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला आणि समाजाला गरज आहे. आणि मराठा समाजातील तरुणांनीही आत्महत्येचं आणि टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. आपसात मतभेद होतील, जाळपोळ होईल, असं काही करू नका. जाळपोळ करणारे दुसरे कोणीतरी आहेत, असं जरांगे म्हणाले. हे जे दुसरे कोण आहेत ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराष्ट्रात अस्वस्थता आहे. आपलं पुढे काय होणार याची सर्व समाजात भीती आहे. मराठा आरक्षण मिळालचं पाहिजे. यात दुमत नाही. मराठे स्वाभिमानी आहेत. दुसऱ्याच्या ताटातलं काही घेणारे नाही. मराठा समाज, धनगर, ओबीसी आणि आदिवासींच्या मनात सध्या धाकधूक आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी शपथ घेतली, मग मधल्या दीड वर्षाच्या काळात काय केलं? आणि आजही ते राज्याच्या पातळीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत असतील, तर चांगलचं आहे. काहीही करा आणि मार्ग काढा. आमच्याशी बोललं नाही तरी चालेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maratha Andolan : आरक्षणासाठी मराठा समाजाच्या संतापाचा भडका; राज्यभरात अलर्ट राहण्याचे पोलिसांना आदेश

महाराष्ट्राची जी एकजूट आणि एकता आहे ती तोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्राने सावध होण्याची गरज आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे, त्यात काय निर्णय होतो, ते कळेलच. पण हा विषय लोकसभेत सोडवण्याचा आहे. आरक्षणाच्या टक्केवारीचा मुद्दा हा लोकसभेत सोडवता येऊ शकतो. यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केली.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maratha Reservation : नारायण राणे, कदम यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com