Manoj Jarange Speech : किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार? जरांगेंनी भुजबळांना थेट आकडाच सांगितला

Maratha Reservation Protest In Mumbai : राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या; तर 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप
Manoj Jarange, Chhagan Bhujbal
Manoj Jarange, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Reservation March Update : मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. तत्पुर्वीच मुंबईच्या वेशीवर दाखल झालेल्या आंदोलकांनी सरकारला इशारे दिले आहेत. नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने आजच अध्यादेश काढावेत. त्यासाठी नवी मुंबईतच थांबतो, अन्यथा उद्या आझाद मैदानावर पोहोचणार आहोत, अशा इशाराही दिला. यावेळी त्यांनी किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, याचाही आकडा सांगितला.

आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार असून त्यासाठी दोन कोटी लोक जमणार असल्याचा दावा जरांगेंनी केला होता. तसेच समाजातील लाखो लोकांना फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. यावर ओबीसी नेत्यांनी जरांगेंची खिल्ली उडवली होती. ओबीसीत पहिल्यापासूनच मराठे कुणबींचा समावेश असल्याचे जरांगेंचा दावा फोल असल्याचेही त्यांनी सांगितले होते. जरांगे (Manoj Jarange) समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही ओबीसी नेत्यांनी केला होता. याला जरांगेंनी आता सडेतोड उत्तर दिले आहे.

Manoj Jarange, Chhagan Bhujbal
Manoj Jarange Speech on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांबाबत आज रात्रीतच अध्यादेश काढा, अन्यथा...; जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

नवी मुंबईत सामान्य प्रशासनाच्या सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर जरांगेंनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोर्चा निघाल्यापासून राज्यात तीन लाख नोंदी वाढल्याचाही दावा केला. जरांगे म्हणाले, 'राज्यात यापूर्वी 54 लाख नोंदी सापडल्या होत्या. आता मोर्चा निघाल्यापासून त्यात तीन लाखांची भर पडली असून तो आकडा 57 लाख झाला आहेत. तसेच 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. मोर्चा निघाल्यापासून सरकारने हालचाली केल्यानेच आकडा वाढला,' असेही जरांगे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी जरांगेंनी सगेसोयऱ्यांचा (Maratha Resrvation) मुद्दा पेटवला. ते म्हणाले, 'आता 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीत कराव्यात. आता त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढावा. त्यासाठी शपथपत्र घेऊन त्याची खात्री करावी. एकाची नोंद सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबीयांनी अर्ज करावे. यातूनच एका कुटुंबातील किमान पाच जणांना तरी लाभ होईल. यामुळे समाजातील सुमारे दोन कोटी 80 लाख मराठ्यांना नव्याने कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे,' असे गणितच जरांगेनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange, Chhagan Bhujbal
Manoj Jarange Speech : मराठा आरक्षणाबाबत मोठा फैसला; काय म्हणाले जरांगे पाटील ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com