'भारतीय जनता पक्षाला डिसेंबरमध्ये मोठे खिंडार'!

आपले नगरसेवक फुटू नयेत, यासाठी त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून धमकावले जात आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील वरिष्ठ नेते मनमानी कारभार करीत आहेत, त्यामुळे त्यांचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. यातील अनेक जण फुटण्याची भीती असल्यानेच भाजप नेते शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असा पलटवार शिवसेना नेते तथा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असा दावाही जाधव यांनी केला आहे. (Many BJP corporators in touch with Shiv Sena leaders : Yashwant Jadhav's claim)

मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहेत. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक-नेते मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल यशवंत जाधव यांनी केला आहे.

BJP
एकमेकांना ललकारणारे खासदार श्रीकांत शिंदे- आमदार राजू पाटील आले एकत्र!

भाजपने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही शिवसेनेने दिले आहे. आपले नगरसेवक फुटू नयेत, यासाठी त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून धमकावले जात असल्याचेही स्थायी समितीचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

BJP
दाजींच्या घरवापसीने अशोक चव्हाण खूष; म्हणाले, काॅंग्रेसला बळकटी मिळेल

शिवसेनेने न्याय दिला

सफाई कामगारांना कामाच्या ठिकाणापासून जवळ घर मिळावे, यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. अखेर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यामध्ये मुंबई शहरात ११२१, पश्चिम उपनगरात १४९९ आणि पूर्व उपनगरात १३८६ अशी एकूण ४००६ घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला असल्याचेही स्थायीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com