maratha reservation:मागासवर्ग आयोग स्थापण्याचा निर्णय चुकीचा : विनोद पाटील

मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे.
Uddhav Thackeray,Vinod Patil
Uddhav Thackeray,Vinod Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मराठा समाजाच्या (maratha reservation)मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, राज्यात एक मागासवर्ग आयोग असताना दुसऱ्या आयोगाची स्थापना करता येत नाही, असे मराठा समाजाचे नेते विनोद पाटील (Vinod Patil)यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी वर्षां निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून खासदार संभाजीराजे आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्याची दखल घेत या समाजाला नव्याने प्रक्रीया राबवून आरक्षण देण्याच्या हालचाली कालपासून सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत.

''सरकारने चुकीचे निर्णय घेऊन पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणीत आणू नये. शिवाय करायचेच असेल तर मागच्याच आयोगात उपसमिती करण्यात यावी. या समितीमध्ये पूर्वी काम केलेल्या चार सदस्य नियुक्त करावेत. त्या उपसमितीला संविधानक दर्जा दयावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,'' अशी सूचना विनोद पाटील यांनी केली आहे. याबाबत समाज माध्यमांवर विनोद पाटलांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती केली जाणार आहे.

Uddhav Thackeray,Vinod Patil
UNSC:युक्रेन-रशिया युद्धाचा भारताकडून निषेध ; मतदानावर बहिष्कार

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation)खासदार संभाजीराजे (mp sambhaji chhatrapati)मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी संभाजीराजेंनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाजीराजे यांनी अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं देखील केली. याशिवाय मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी सरकारपुढे ५ मागण्या ठेवल्या होत्या. मात्र त्या मागण्यांची अद्याप पुर्तता झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com