Maratha Kranti Morcha : राज्यपालांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने आखली 'ही' रणनीती

Maratha Kranti Morcha : कोश्यारी,चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अशा ठराव करण्यात आला.
Maratha Kranti Morcha  News update
Maratha Kranti Morcha News updatesarkarnama

Maratha Kranti Morcha News : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे मराठा आरक्षण गोलमेज परिषद घेण्यात आली. या परिषदेत विविध विषयांवर १५ ठराव मंजूर करण्यात आले. (Maratha Kranti Morcha News update)

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अशा ठराव या परिषदेत करण्यात आला. या ठरावासह अन्य १५ ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे मराठवाड्यात होणारे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावण्याच्या ठरावासहित एकूण 15 ठराव घेण्यात आले, अशी माहिती डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिली.

Maratha Kranti Morcha  News update
Gautam Adani News : नरेंद्र मोदींशी किती जवळीक ? खुद्द अदानींनीच सांगितले .. “सरकार कुणाचेही असो.."

मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढणाऱ्या राज्यातील विविध संघटना, अभ्यासक व सामान्य कार्यकर्ता आदी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या जालना जिल्ह्याने यांचे आयोजन केले होते.

मराठा आरक्षणासाठी कुठलीच बैठक घेत नाहीत, तसेच आरक्षण मिळण्यासाठी काहीही पुढाकार घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. दुसरीकडे कोश्यारी यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झाला आहे.

कडकडीत बंदचे आयोजन

भगतसिंह कोश्यारी ‘छत्रपती संभाजीनगर’ व नागपूर येथे येणार आहेत. त्या दिवशी तेथे शिवभक्तांकडून कडकडीत बंदचे आयोजन करावे, असा ठरावही या परिषदेत मंजूर करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com