Gautam Adani News : नरेंद्र मोदींशी किती जवळीक ? खुद्द अदानींनीच सांगितले .. “सरकार कुणाचेही असो.."

Gautam Adani News : अदानी यांच्यावर होते असलेल्या आरोपावर त्यांनी खुलासा केला आहे.
Gautam Adani News
Gautam Adani Newssarkarnama
Published on
Updated on

Gautam Adani News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरदहस्त असल्यामुळेच उद्योगपती गौतम अदानी यांनी मागील काही काळात उद्योगविश्वात मोठी प्रगती केली आहे, असा आरोप अदानीवर नेहमी करण्यात येतो. यावर अदानी यांनी भाष्य केलं आहे. गुजरातमधील आपल्या व्यवसाय वाढीबाबत अदानींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची किती जवळीक आहे? त्यांचे यश आणि मोदी यांचा संबंध काय? याबाबत अदानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अदानी यांच्यावर होते असलेल्या आरोपावर त्यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणाले, "उद्योगाला प्रोत्साहन देणारं गुजरात सरकार आहे. गुजरात सरकारने आमच्यासाठी काही विशेष केलं असं नाही. पंतप्रधान मोदींसोबतच्या संबंधांवर टीका करणारे हे सोयीनं विसरतात की माझा प्रवास जवळपास चार दशकांपूर्वीच सुरू झाला आहे"

Gautam Adani News
cast based census News : नितीश कुमारांचा कित्ता शिंदे सरकार गिरवणार का ?

"राज्य सरकार कुणाचेही असो मला कोणतीही अडचण येत नाही.ममता दीदींच्या पश्चिम बंगालमध्ये, नवीन पटनायकजींच्या ओडिशामध्ये, जगनमोहन रेड्डींच्या राज्यात आणि अगदी केसीआरच्या राज्यातही आम्ही काम करत आहोत. फक्त भाजपाशासित राज्यांमध्येच आमचा व्यवसाय आहे असं नाही"," असे सांगत गौतम अदानी यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत सांगितले.

गौतम अदानी म्हणाले, "काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही"

Gautam Adani News
MNS News : मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं ; मनसेचा गौप्यस्फोट

अदानी यांनी मुलाखतीत त्यांचे यशाच्या रहस्याबाबत सांगितले. ते म्हणाले, "व्यवसाय आणि व्यावहारिक जीवनात एकच सूत्र काम करतं. ते म्हणजे मेहनत आणि फक्त मेहनत. कौटुंबिक पाठबळ आणि देवाची कृपाही तुम्हाला खूप मदत करते. गुंतवणूक करणं हे आमचं काम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निमंत्रणावरून आम्ही राजस्थानच्या इन्व्हेस्टर समिटलाही गेलो होतो. यानंतर राहुल गांधीजींनीही राजस्थानमधील आमच्या गुंतवणुकीचे कौतुक केलं होतं,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com