Maratha protest cases : शासकीय संपत्तीचे नुकसान, सुप्रीम कोर्टाचे निर्देश! मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis statement : पहिल्या टप्प्यात दाखल करण्यात आलेल्या ५४८ गुन्ह्यांपैकी २८६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, तर २३ गुन्हे मागे घेतले जावेत, यासाठी न्यायालयात प्रलंबित आहेत.
Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra protest news : मराठा आरक्षणासाठी राज्यभर झालेल्या विविध आंदोलनांमधील जवळपास दीड हजारांहून आंदोलकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याच आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार अनेक गुन्हे मागेही घेण्यात आले आहेत. मात्र, काही गुन्हे मागे न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे मागे न घेण्यासंदर्भात गृह विभागाची कुठलीही बैठक झाली नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, अशी कुठलीही बैठक झालेली नाही. कुठलाही गुन्हा मागे घेण्याकरता नकार दिलेली नाही. पहिल्या दिवसापासून हे स्पष्ट आहे की, ज्यामध्ये शासकीय संपत्तीचे नुकसान झाले आहे, ते गुन्हे परत घेता येत नाहीत. याबाबत स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्याव्यतिरिक्त इतर गुन्हे आम्ही परत घेत आहोत.

Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
State Commission for Women : मोठी बातमी : राजकीय पक्षाच्या अध्यक्षालाच हवे महिला आयोगाचे अध्यक्षपद; वेळप्रसंगी 'राष्ट्रवादी'त प्रवेश करण्याचे संकेत

गुन्ह्यांची सद्यस्थिती काय?

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पहिल्या टप्पात ऑगस्ट २०१८ पर्यंत एकूण ५४८ गुन्हे दाखल झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यात चार मार्चपर्यंत ९६१ गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील गंभीर १७ तर दुसऱ्या टप्प्यातील ६४ गुन्हे मागे घेता येणार नाहीत. तर दुसऱ्याच टप्प्यातील ६२ गुन्ह्यांवर विभागीय समितीचा अद्याप निर्णय झालेला नाही.

Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Dr. Ambedkar jayanti 2026 : महाराष्ट्रातील चिमुरड्यांचा ‘हा’ खास बॅनर पाहिलात का? थेट केंद्रीय मंत्र्यांनी दिला ‘जय भीम’चा नारा

पहिल्या टप्प्यात दाखल करण्यात आलेल्या ५४८ गुन्ह्यांपैकी २८६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, तर २३ गुन्हे मागे घेतले जावेत, यासाठी न्यायालयात प्रलंबित आहेत. मात्र १७ गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील ९६१ गुन्ह्यांपैकी ५४२ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, १८८ गुन्हे न्यायालयात मागे घेण्यासाठी प्रलंबित आहेत. तर ६४ गुन्हे मागे घेता येणार नाहीत आणि ६२ गुन्ह्यांवर अद्याप विभागीय समितीने निर्णय घेतलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com