Satara Bandh News: जालन्यात मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. मात्र, त्याला शुक्रवारी गालबोट लागले. पोलिसाकडून आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. अनेक राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांसह खासदार उदयनराजेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. आता पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ सोमवारी( ता.४) सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
जालना(Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. यामध्ये सोमवारी सातारा जिल्हा 'बंद'ची हाक देण्यात आली आहे. शांततेच्या मार्गाने हा बंद करण्यात येणार असून व्यापाऱ्यासह सर्व दुकानदारांनी बंदला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठा आंदोलकां(Maratha Protest) वरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात सर्वत्र मोर्चे, रास्ता रोको, मूकमोर्चे निघाले. शनिवारी राजधानी सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. आता मराठा क्रांती मोर्चाने सर्व मराठा बांधवाना उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
खासदार उदयनराजेंंच्या (MP Udayanraje Bhosale) साताऱ्यासह येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीत अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच राज्य सरकार व प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या सोमवारी सातारा जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आली.
पोवई नाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात येणार आहे. त्यानंतर अंतरवाली सराट येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. सातारा शहरात व्यापाऱ्यांना बंद मध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे. व्यापाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना देण्यात आल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.