Maratha Reservation : ''राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू'', मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती!

CM Eknath Shinde News : मराठा समाज मागास कसा आहे? हे सिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सॅम्पल सर्वे करण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद केले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation and CM Shinde : राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिंदे म्हणाले, ''न्यायमूर्ती शिंदे समितीच्या मार्गदर्शनाखाली कुणबी नोंदी युद्धपातळीवर शोधण्याचं काम केले जावं आणि त्यामध्ये विभागीय आयुक्तांनीही यावर देखरेख करावी. दररोज यावर देखरेख झाली पाहिजे.

जिल्हापातळीवरसुद्धा वेबसाइटवर त्या कामाच्या प्रगतीचा रिपोर्ट टाकला पाहिजे. राज्यस्तरीय वेबसाइटवरदेखील याची संपूर्ण माहिती दिली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या आहेत.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर मोठा आरोप, म्हणाले...

''त्याचबरोबर जी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यासंदर्भातदेखील जे मागासवर्ग आयोग आहे. त्या आयोगाला लागणार जो इम्पिरिकल डेटा जो आहे, तोही युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत,'' असंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय ''दोन आघाड्यांवर आपण काम करतो आहोत. एक कुणबी नोंदी आणि दुसरं क्युरेटिव्ह पिटिशनसाठी इम्पिरिकल डेटा. मराठा समाज मागास कसा आहे? हे सिद्ध करण्यासाठी काही मोठ्या प्रमाणावर सॅम्पल सर्वे करण्याची आवश्यकता आहे.

त्याच्याही सूचना दिल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन करावा. त्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवून काम पाहावं आणि मुख्यमंत्री कार्यालयातून खारगे हेदेखील त्याचा आढावा घेतील. जेणेकरून कुठेही काही त्रुटी राहिल्या तर त्याची पूर्तता करता येईल. म्हणून युद्ध पातळीवर हे काम करण्याच्या सूचना संबंधित विभागास मी आता दिलेल्या आहेत,'' अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shinde
Maratha Reservation : मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर; सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

याचबरोबर, ''यामध्ये विरोधी पक्षांनीही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांची बैठकही आम्ही बोलावली होती. त्यामध्ये सर्व पक्षाचे नेते सहभागी झाले होते, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कायदेशीर आणि टिकाणारं आरक्षण देण्यावर सगळ्यांचं एकमत झालं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, यावरही सगळ्यांचं एकमत झालं. नक्कीच यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल, यासाठी सर्व विरोधी पक्षांना आवाहन आहे की, यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं,'' असं आवाहनही या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

CM Eknath Shinde
Supriya Sule : ''सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर...'', सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा फडणवीस लक्ष्य!

तसेच, ''मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला माझे आवाहन आणि विनंती आहे, की राज्य सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक युद्धपातळीवर काम करत आहे. या कामाचा दैनंदिन आढावाही जनतेसमोर मांडला जाईल. जेणेकरून जनतेलाही समजेल, की सरकार अतिशय प्रामाणिकपणे यावर काम करत आहे,'' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

(Editorial - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com