Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Eknath Shinde, Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचा उल्लेख 'असा' केला; शिंदे जरांगेंवर नाराज आहेत का?

Eknath Shinde : पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांच्या उपोषणावर मुख्यमंत्री काय बोलले?
Published on

Manoj Jarange Patil News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेत असल्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाने बनवलेला मराठा सर्व्हेक्षणाचा अहवाल स्वीकारला. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा केलेला उल्लेख.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांचा उल्लेख करताना एक शब्द आवर्जून वापरला. शिवाय त्यांनी 'दुर्दैवाने' या शब्दाचाही वापर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मोठी बातमी ! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवाय मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली. त्याचवेळी सरकारची भूमिका स्पष्ट असताना आंदोलनाची भूमिका घेणं उचित नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षणातील अडथळे सरकारने दूर केले आहेत. अशा वेळी आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं. दुर्दैवानं ते झालं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरील प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. यावेळी त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही केलं.

विशेष म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारले असतानाही मुख्यमंत्र्यांनी एकदाही त्यांचं नाव घेतलं नाही. त्यांचा उल्लेख आंदोलक असंच केलं. जरांगे-पाटील यांचं नवी मुंबईतील उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडण्यात आलं. त्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. शिवाय यापूर्वी जरांगे-पाटील यांचे दोन्ही उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांचं नाव न घेणं, ही बाब सर्वांच्याच लक्षात आली. शिवाय जरांगेंचा उल्लेख ते आंदोलक असाच करत होते. सरकार सकारात्मक असूनही जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत का, अशी चर्चा आता होत आहे.

जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. सगेसोयरे शब्दाविषयी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Maratha Reservation : जरांगे पाटलांची तब्येत खालावली; मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com