Maratha Reservation : 'जे मान्य होणार नाही, त्यासाठी हट्ट कशाला?', मनोज जरांगेंच्या आंदोलनावर फडणवीसांचा मंत्री स्पष्टच बोलला

Manoj Jarange Patil Protest Chandrakant Patil : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Chandrakant Patil and Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. हैद्राबाद, सातारा गॅझेट लागू करा, मराठा कुणबी एकच आहे असा जीआर काढा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, सांगलीमध्ये मंत्री चंद्रकात पाटील यांनी मनोज जरागेंच्या उपोषणाविषयी विचारले असता 'जे मान्य होणार नाही, त्यासाठी हट्ट कशाला?' असा सवाल केला. या संदर्भात एका वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व्यावहारिक मागण्या कराव्यात. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत, त्यासाठी ते आंदोलनास बसले आहेत. व्यवहारिक मागण्या कराव्यात सरकार त्या मान्य करेल.'

मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या याचा पाढाच चंद्रकांत पाटील यांनी वाचला. ते म्हणाले, त्यांनी पूर्वी केलेल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाखांची नुकसानभरपाई तसेच वारसांना शासकीय नोकरी घेतले आहे. फक्त यातून 9 जणांना वगळण्यात आले.

तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यात दहा लाखांपेक्षा अधिक नोंदी सापडल्या आहेत. कुणबी दाखल्याच्या नोंदीसाठी 23 कागदपत्रांची तपासणी केली जात आहे, असे सांगत चोवीस तास चालणाऱ्या मुंबईला वेठूस धरू नये असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले.

Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवताच जरांगे संतापले, म्हणाले "स्वत:चं पोरगं पाडलं, किती दिवस भाजपची..."

मध्यरात्री 'वर्षा'वर चर्चा

मनोज जरांगे-पाटील यांची शिंदे समितीने भेट घेतल्यानंतर देखील त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान 'वर्षा'वर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे आले होते. मुख्यंत्र्यांसोबत दोघांनी तासभर चर्चा केल्याची माहिती आहे.

Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Congress Vs BJP: राहुल गांधींनी मतचोरीचा पहिला आरोप केलेल्या भाजपच्या नेत्याच्या मतदारसंघातून काँग्रेस मोठा लढा उभारणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com