Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची पोलिसांना धास्ती, नेटकरीही उतरले मैदानात!

Maratha Reservation Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. सोशल मीडियावर देखील जरांगेंना पाठींबा मिळत आहे.
Maratha reservation Manoj Jarange Patil
Maratha reservation Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (शुक्रवारी) मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन होत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या या आंदोलनाची पोलिसांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. विशेषता सोशल मीडियावर नेटकरी या विषयी आक्रमक आहेत. या आंदोलनाला मिळणारा राज्यभरातून प्रतिसाद पाहता राजकीय मंडळींसोबत पोलिसांनी याबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या सरकाने दिलेला शब्द, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन याचे व्हिडिओ नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत सरकार शब्द फिरवत आहे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत आहेत. काही जण आपले वैयक्तिक अनुभव कथन करून शाळेत फी भरण्यासाठी घरच्यांना कसे हाल सोसावे लागले हे सांगत आरक्षणाची आवश्यकता सांगत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विविध मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका यापूर्वीच मांडली आहे. या भूमिकेचा प्रतिवाद मनोज जरांगे करीत होते. भाजपने या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याने यावरील राजकारण तापले आहे.

Maratha reservation Manoj Jarange Patil
OBC Vs Jarange: मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार; ओबीसी महासंघ मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत...

मुंबई लगत असलेल्या ठाणे, कल्याण, नवी मुंबई, नाशिक या जिल्ह्यांमधून जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज येथून मोठ्या संख्येने सकार्यकर्ते रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गासह मुंबईलगत ठाणे आणि अन्य भागात वाहतूक कोंडी होण्याचा अहवाल पोलिसांनी शासनाला सादर केला आहे.

या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या विविध आमदारांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आमदार आणि खासदार यांनी उघडपणे पुढाकार घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन केले आहे.

या आंदोलनावरून महायुती सरकार मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मनोज जरांगे पाटील यांनी सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्येही आंदोलनाला सामोरे जाण्याबाबत मतभेद निर्माण होऊ शकतात. या दृष्टीने भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक अतिशय आक्रमकपणे उत्तर देत आहेत. एकंदरच आज समाज माध्यमांवर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा ट्रेंड जोरात आहे.

Maratha reservation Manoj Jarange Patil
Manoj Jarange Aandolan: वारं फिरलं! मनोज जरांगेंनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 'या' केंद्रीय मंत्र्यांचा पाठिंबा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com