Mumbai : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण पेटलं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी छत्तीसगडला गेल्याची टीका महाविकास आघाडीने केली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहे. त्याला भाजप आमदार नीतेश राणेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
"राज्यातील अराजकापेक्षा फडणवीसांना निवडणूक समितीची बैठक महत्त्वाची वाटते, हे दुःखद आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस गेले होते. भाजप आमदार नीतेश राणेंनी समाज माध्यमांवरून ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ठाकरे कुटुंब काल, गुरुवारी दुपारी एक वाजता खासगी विमानाने डेहराडूनला गेले आहे. सोबत त्यांचे स्वयंपाकी आणि कर्मचारी वर्गदेखील असल्याचे मला कुणीतरी सांगितले. हीच त्यांची मराठा आरक्षणाबद्दलची चिंता आहे का? जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेले नाही, याची पर्वादेखील त्यांनी केली नाही, मग देवेंद्र फडणवीसांना दोष का दिला जात आहे? ते तर पक्षाच्या काम करीत होते, त्यांच्यासारखे सु्ट्टीचा आनंद घेत नाहीत," असे टि्वट राणेंनी केले आहे.
"मराठा समाज हा मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे. हे उपोषण त्यांच्या जिवावर बेतू शकत होते. त्यांची तब्येत खालावत होती, त्यामुळे आमच्या सगळ्यांशी भावना होती की, तुम्ही जिवाला सांभाळा असे वेळोवेळी आवाहन उद्धव ठाकरेंनीही त्यांना केले होते. सर्वपक्षीय बैठकीत काही तोडगा निघाला नाही, सरकारचे जेव्हा शिष्टमंडळ गेले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दोन जानेवारीपर्यंत मुदत दिली आणि उपोषण मागे घेतले, परंतु पेच कायम आहे. हे सत्य आहे. या उपोषणामागे कुणी राजकारण करते का? हा एक संशोधनाचा विषय आहे," असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जालनाच्या अंतरवाली सराटीत नऊ दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटलांचे उपोषण काल मागे घेतले आहे. जरांगेंनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन समजूत काढली. यात त्यांना यशही आले. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्तींसह मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, अतुल सावे, संदीपान भुमरे यांचाही समावेश होता, पण याचवेळी त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.