Maratha Reservation All Party Meeting : जरांगेंनी सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवावा; एकनाथ शिंदेंचे आवाहन

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली
Maratha Reservation All Party Meeting :
Maratha Reservation All Party Meeting : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज (ता. १) सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाची सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी 'मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकपणावर आम्हाला विश्वास आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारही प्रमाणिक प्रयत्न करत आहेत. या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून उपोषण मागे घ्यावे,' अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची विस्तृत बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारचीच नव्हे तर सर्वांचीच भूमिका आहे. आजच्या बैठकीत, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असा ठराव करण्यात आला. त्याचवेळी, इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीही भूमिका घेण्यात आली.

Maratha Reservation All Party Meeting :
Maratha Reservation Blog : भले शाब्बास मराठ्यांनो ! अजस्त्र सरकार, अहंकारी नेत्यांना जमिनीवर आणले...!

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचे कायदेशीर बाबींसह दोन स्तरावर आपले काम सुरू आहे. मराठवाड्यात कुणबी दाखल्यांसंबंधी आणि सर्वोच्च न्यायालयात कोर्टातील क्युरेटिव्ह पिटिशनवर काम करणे, यासंदर्भात कायदेशीर काम सुरू आहे. तीन न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे. मागासवर्गीय आयोगही युद्धपातळीवर काम करत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यावरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. पण मराठा जनतेने थोडा संयम बाळगावा, मराठा समाजाने आरक्षणासाठी थोडा वेळ व सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

याचवेळी त्यांनी राज्यातील हिंसक आंदोलनांवरही भाष्य केले. मराठा आरक्षणासाठी आजवर शांततेत आंदोलने झाली, पण अलीकडे या शांतताप्रिय आंदोलनांना हिंसक वळण लागले आणि शांतताप्रिय आंदोलनाला गालबोट लागले. पण राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. त्यामुळे मराठा समाजाने अशी हिंसक आंदोलने थांबवावीत, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यभरात मराठा आरक्षणासाठी वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यभरात आमदार खासदारांना मराठा समाजाने गावबंदी केली आहे. राज्यभरात राजकीय सभा, कार्यक्रम उधळून लावले जात आहेत. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या वाहनांची आणि घरांची तोडफोड कऱण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Maratha Reservation All Party Meeting :
Bachchu kadu : फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेल्या बच्चू कडूंची राजकीय कोंडी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com