Raj Thackeray Speech : मुंबई-गोवा महामार्ग २०२४ पर्यंत पूर्ण होईल, हे सरकार आता सांगत आहे. हे चांगलंच आहे, पण पुढे काय? मुंबई-पुणे महामार्ग झाल्यानंतर पुणे पसरत गेलं. त्यानंतर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणसाची घुसमट होऊ लागली. हेच कोकणातही होणार, अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ते पनवेलमध्ये बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्गासाठी आजपासून मनसे मैदानात उतरली आहे. यासाठी आज राज ठाकरेंनी पनवेलमध्ये सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, " गोव्यात २०२३ चा कायदा आहे, की गोव्यात इतर कोणत्याही परप्रांतीयालासहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागेल, तिथे इतर उद्योग, हॉटेलं असं काही उभारण्यास पूर्णपणे बंदी आहे.
आम्ही गोव्याचा गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात काय तर उत्तर भारतीयांना जमिनी देऊन गोव्याची वाट लावू देणार नाही आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री, असंही राज ठाकरेंनी नमुद केलं.
राज ठाकरे म्हणाले, आपण परप्रांतीयांना महाराष्ट्रातल्या जमीन विकतोय. तिकडे प्रकल्प येत आहेत. तिथे फायदा कुणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार. पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या मी विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. माझा मंडणगडचा अध्यक्ष तर एक पंजाबी आहे. असंही त्यांनी नमुद केलं.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंगचेही उदाहरण दिले. " अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंगवर एकदा छोटं विमान आदळलं, बिल्डिंगच्याखाली एकदा बॉम्बस्फोटही झाला, पण ती बिल्डिंग जागची हलली नाही. ती बिल्डिंग फक्त १४ महिन्यांत बांधून झाली. पण वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्षे लागली. तर मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं? असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.