लढाईला तयार राहा; उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना लावले कामाला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक
Uddhav Thackeray latest marathi News
Uddhav Thackeray latest marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर राज्यभरातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. 'कुणी गेले आहे, याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या. 'लढाईला तयार राहा' तसेच आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. (Uddhav Thackeray latest marathi News)

त्याच बरोबर 'तळागाळात जावून लोकांची कामे करा. मुंबईत ज्याप्रमाणे पक्ष काम करतो, त्याप्रमाणे राज्यातही कामे करा, असेही ठाकरे यांनी सांगितले. या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती. कुठल्याही प्रकारची नाराजी पदाधिकाऱ्यांमध्ये नाही. आणखी जोशाने जिल्हा प्रमुख कामाला लागले आहेत, अशी माहिती रायगड उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी माध्यमांशी बोलतना दिली. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असाही सूर या बैठकीत निघाला.

Uddhav Thackeray latest marathi News
द्रौपदी मुर्मूंच्या निवडीनंतर देशातील दीड लाख गावांमध्ये भाजपची जंगी सेलिब्रेशनची योेजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे दिसत आहे. शिंदें यांच्या पाठोपाठ अनेक महापालिकांमधील माजी नगरसेवकही त्यांच्या गटात सहभागी होत आहेत. त्यानंतर शिवसेना खासदारांनीही पक्षप्रमुखांवर भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे 'मातोक्षी'वर सत्र सुरु आहे.

ठाकरे यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. जे लालसेपोटी, आमिषाला बळी पडून गेले, त्यांच्यामुळे संघटनेला काही फरक पडणार नाही. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झाल्या आहे. वर्षानुवर्षे जे काम करत आहे, त्यांना संधी मिळाली. जे गेले आहेत, त्यांच्यापेक्षा अधिक जोशाने काम करुन विधानसभेवर भगवा फडकवणारच, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला.

Uddhav Thackeray latest marathi News
मोठी बातमी; राज्यातील 92 नगरपरिषदा अन् 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

शिवसेना व धनुष्यबाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याला कोणीही वेगळे करू शकत नाहीत. जे बंडखोर आहेत, ते लोकांना आकर्षित करण्यासाठी अफवा पसरवत आहे, ३६५ दिवस काम करणारा शिवसेनिक आहे, सहा महिन्यानंतर जरी निवडणूक लागल्या तरी चालेल. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असेही जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com