भाजप हा मित्रांचा घात करणारा पक्ष

नवी मुंबईत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा
vijay nahata
vijay nahata Sarkarnama
Published on
Updated on

वाशी : भारतीय जनता पक्ष हा फक्त लबाड आणि कपटीच नाही, तर मित्रांचा घात करणारा पक्ष आहे. या पक्षाची महाराष्ट्रातील ताकद संपली आहे, त्यामुळे आता त्यांना ईडी आणि सीबीआयचा आधार घ्यावा लागत आहे. फक्त दहशत निर्माण करण्याचे काम आता भाजपकडून सुरू आहे, अशी टीका शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी केली. (Meeting of Yuva Sena office bearers in Navi Mumbai)

युवासेनेच्या वतीने आयोजित पदाधिकारी संवाद मेळावा नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला. त्यात नाहटा बोलत होते. या प्रसंगी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, युवा सेना कोर कमिटी सदस्य रूपेश कदम, योगेश निमसे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, पूनम आगवणे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, एम. के. मढवी, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, करण मढवी आदी उपस्थित होते.

vijay nahata
अडचणीतील राष्ट्रवादीसाठी दिलीप वळसे पाटील संकटमोचक बनले!

युवासेना पदाधिकारी मेळाव्यांना राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळत असून, राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत मेळावे झाले आहेत. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातही युवासेना आणि शिवसेनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. युवासेनेचा पहिला नगरसेवक नवी मुंबईतून निवडून आला आहे. त्यामुळे युवासेना आणि नवी मुंबई यांचे आगळेवेगळे नाते तयार झाले आहे. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहणार आहे, असा विश्वास युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आज व्यक्त केला. आगामी निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धारही केला.

vijay nahata
संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

कोरोनाकाळात शिवसैनिकच रस्त्यावर!

शिवसेना ही स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवून काम करीत नाही. कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी शिवसैनिक आणि युवासैनिकच रस्त्यावर दिसत होते. फक्त रुग्णांना मदतच नाही तर रक्तदान करण्यातही शिवसेना आघाडीवर होती. आगामी निवडणुकीनंतर महापालिकेच्या प्रत्येक दालनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लागणार आहे, असे प्रतिपादन खासदार राजन विचारे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com