Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) युवक काँग्रेसचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा आमदार निवासामध्ये दोन व्यक्तिंशी झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची आता पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येत आहे. मेहबूब शेख यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आता तक्रार दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
मुंबईतील आमदार निवासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याशी आणखी दोन व्यक्तिंशी झटापट झाली. याबाबत शेख म्हणाले, 'रात्री झोपलेलो असताना दोघे जण दारुच्या नशेत आमदार निवासात घुसले आणि त्यांनी वाद केला. त्यांनी माझ्याशी झटापट केली, असा आरोप शेख यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मेहबूब शेख यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येत आहे. दरम्यान, मेहबूब शेख देखील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हजर राहिले आहेत. एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत प्रकिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली फोनवरुन माहिती घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.