पुणे : अयोध्येतील बाबरी मशिद 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी पाडली होती. या घटनेची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव व शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी सोमवारी काढली. बाबरी मशिद पाडतानाचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे. अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नमन केलं आहे.
नार्वेकर यांनी मात्र शिवसेना लिहिलेला फोटो ट्विट करत शिवसैनिकांना नमन केल्याने त्यावरून आता चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नार्वेकर यांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
नार्वेकर यांच्या ट्विटविषयी फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, 'योग्यच आहे ते. चूक काय आहे त्यामध्ये?.' फडणवीस यांच्या उत्तरानंतर शेजारीच उभ्या असलेल्या राणेंनाही राहवलं नाही. ते म्हणाले, 'मिलिंद नार्वेकर हे कोण आताचे नवीन शिवसेना प्रमुख आहेत का?.' राणे यांच्या या उत्तरावर फडणवीसही खदखदून हसले. राणे व फडणवीस यांनी या मुद्यावर अधिक बोलण्याचे टाळले.
दरम्यान, पुण्यात सिम्बायोसिस संस्थेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस व राणे यांची उपस्थितीत होती. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही प्रवृत्ती आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाणाऱ्या कामाला विरोध करत आहेत. त्यांनी विरोध न करता यात सहकार्य करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.