Ganesh Naik Navi Mumbai election : मंत्री नाईक नवी मुंबईत महायुतीला बाजूला सारणार? शिंदेंची शिवसेना 'टार्गेट'वर!

Ganesh Naik to Contest Navi Mumbai Municipal Election Independently BJP Leader Move Away from Mahayuti : भाजप मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत माजी नगरसेवकांच्या मॅरेथॉन बैठका घेण्यास सुरवात केली आहे.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai BJP politics : भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी महायुतीला थेट इशारा देत, नवी मुंबईला बारवी धरणातून मिळणाऱ्या 40 एमएलडी पाणीचोरीचा मुद्दा आगामी निवडणुकीत प्रचारासाठी वापरणार असल्याचे जाहीर केले. गेल्या आठ महिन्यांपासून हे पाणी नवी मुंबईला मिळत नसून, लोकप्रतिनिधींच्या अभावी नगरविकास विभागाने महापालिकेला हवे तसे वागवले, असा आरोप मंत्री नाईक यांनी केला.

तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. ऑक्सिजन, औषधे आणि कोविड काळात सिडकोचा निधी दुसऱ्या शहरांमध्ये वापरल्याच्या मुद्द्यावरून नाईकांनी नाव न घेता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

वाशी इथं झालेल्या आढावा बैठकीत बोलताना भाजप (BJP) मंत्री नाईक यांनी, पाच वर्षे महापालिकेत लोकप्रतिनिधींची समिती नसल्यामुळे प्रशासनाला राबवले गेले आणि नवी मुंबईची जनता तहानलेली राहिली, हे नगरविकास विभागाचे अपयश आहे, असा घणाघात केला. कोविड काळात रबाळे एमआयडीसीमध्ये तयार केलेला ऑक्सिजन गॅस आणि रेमडेसिविरसारखी महत्त्वाची औषधेही चोरून नेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सिडकोचा निधी मुंबई अन् ठाण्याकडे...

मंत्री नाईक यांनी सिडकोवरही जोरदार टीका केली. नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनी घेतल्या असतानाही प्रकल्पग्रस्तांना मदत करण्याऐवजी सिडकोचा निधी मुंबई आणि ठाण्यात वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, महापालिकेला मिळायला हवे असलेले भूखंड विकसकांच्या घशात घातले जात असल्याचा गंभीर आरोप मंत्री नाईक यांनी केला.

Ganesh Naik
Mangalprabhat Lodha : 100 कोटींच्या गैरव्यवहाराच्या फायली दाबल्या; 2021मध्ये प्रदीर्घ चर्चा, जुन्या प्रकरणावर मंत्री लोढांची मोठी घोषणा

ती 14 गावे बाहेर काढणार

याशिवाय, महापालिका निवडणुकीनंतर कल्याण तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेली 14 गावे पहिल्या सहा महिन्यांत बाहेर काढली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्री नाईक यांनी या वेळी सांगितले. या गावांच्या समावेशामुळे नवी मुंबईकरांवर सहा हजार कोटींचा भुर्दंड पडला आहे. तो असाच नवी मुंबईकरांवर टाकू देणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

Ganesh Naik
Maharashtra Politics: हाॅटेलमध्ये आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट? सत्य काय ते समोर आलं; स्वतः फडणवीस म्हणाले, 'आम्ही समोरासमोर...'

मंत्री नाईकांच्या मॅरेथॉन बैठका

भाजप मंत्री नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची स्वबळावर तयारी सुरू केल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सपाटा लावला आहे. मंत्री नाईक यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बांधणी केली जाते. मंत्री नाईक यांनी आता पुन्हा माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करत निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून स्वबळावरची तयारी केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com