प्रतापगडावर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Mangal Prabhat Lodha : विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल...
Mangal Prabhat Lodha Latest News
Mangal Prabhat Lodha Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Mangal Prabhat Lodha : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांकडून सातत्याने महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. यावरून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यामुळे हा वाद काही थांबायचं नाव घेत नाही.

दरम्यान, आज शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाशी केल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माणा झाला यावरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल सुरू केल्याने लोढा यांनी आपली बाजू मांडली आहे. (Mangal Prabhat Lodha Latest News)

Mangal Prabhat Lodha Latest News
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना उदयनराजेंचा इशारा,आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत.. राज्यपालांचाही केला उल्लेख

काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी आणि भाजप (BJP) प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता मंगलप्रभात लोढांच्या या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा राजकारणं तापलं आहे. यामुळे लोढा यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत आपल्या केलेल्या वक्तव्यावर स्फष्टीकरणं दिलं आहे.

लोढा म्हणाले, विरोधकांना बोलायचा अधिकार आहे. मात्र जे झालं नाही आणि जे टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे, ते राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत. त्यांनी मी नेमकं काय बोललो हे त्यांनी बघितलं असेल का? मी फक्त उदाहरण दिलं होतं, महाराजांची तुलना केली नाही आणि करूही शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा काय करेल आणि मी तर तो कधीच करणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपली बाजू मांडली.

Mangal Prabhat Lodha Latest News
Uddhav Thackeray: युतीसाठी वंचितचे पाऊल पडले पुढे; ठाकरेंकडून मात्र प्रतिसाद नाही...

ते पुढे म्हणाले की, मी कधीच वैयक्तिक टिपण्णी करत नाही आणि, राजकारणातही पडत नाही. सरकारचं काम सकारात्मकतेने करायचं आहे, हेच माझ्या डोक्यात आहे. महाराष्ट्रात अनेक समस्या असून. माझ्याकडे जे काही दोन-तीन विभाग आहेत, त्यामध्ये मी आणखी काय करू शकतो या प्रयत्नात मी आहे.

आरोप करणे हा लोकशाहीत विरोधी पक्षाचा व सर्वांचाच अधिकार आहे आणि आम्ही त्याचं उत्तरही दिलं पाहिजे, यासाठीच मी तुमच्या समोर आलो आहे. मी तुलना केली नसून उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात महाराजांचं उदाहरण प्रत्येक मुलाला दिलं जातं. त्याच्या जन्मापासून त्याला शिकवलं जातं की, छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? मग तेव्हा काय त्यांची तुलना केली जाते का?, असा सवालही त्यांनी केला. याबाबत जे राजकारण केलं जातयं ते व्हायला नको. महाराज तळपता सूर्य होते, त्यांची त्याच स्थानवर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आपणं बंद झालं पाहिजे, असे म्हणत लोढा यांनी आपली बाजू मांडली आहे.

Mangal Prabhat Lodha Latest News
Keshav Upadhye : ''आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे मुंबईकरांवर 10 हजार कोटींचा बोजा!''

दरम्यान, शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली होती. शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी, असे वक्तव्य लोढांनी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com