Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक; अजित पवारांच्या मंत्र्यांनी ठेवले कानावर 'हेडफोन'

Ajit Pawar News : मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
Shambhuraj Desai News
Shambhuraj Desai NewsSarkarnama
Published on
Updated on

Shambhuraj Desai News : उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडऊन दिली. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट समारोपासाठी होती? अशी टीका विरोधी पक्षांनी केली. या सगळ्या चर्चांवर पंतप्रधान मोदींनीच महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री असे म्हटले होते. त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी विधीमंडळात मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री कानावर हेडफोन लाऊन सांत बसले होते.

अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असे होर्डींग्स राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार आणि त्यांच्या जागी अजित पवार दिसणार अशी चर्चा सुरू झाली. त्याच दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

Shambhuraj Desai News
Rajya Sabha News : 'आप'ला धक्का : संजय सिंह राज्यसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित

या भेटीच्या विविध चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुती केली. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला. आज (ता.२४) विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. अजित पवार सभागृहात बसलेले असताना शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुकास्पद निवेदन केले.

Shambhuraj Desai News
Monsoon Session 2023 : दुर्दैवानं थोडं इतिहासात जावं लागेल, असं म्हणत फडणवीसांनी...

देसाई म्हणाले, काल पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा कष्टाळू मुख्यमंत्री असा उल्लेख केला. ही गोष्ट आमच्या मंत्रिमंडळासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही सगळे पंतप्रधानांचे आभार मानतो. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मला घरात बसणारा नाही तर बाहेर पडून लोकांची कामे करणारा कार्यकर्ता हवा आहे. तसेच काम शिंदे यांनी केले आहे. हे ऐकत असताना राष्ट्रवादीचे मंत्री 'हेडफोन' लावून शांतपणे ऐकत होते. भाजपचे नेते बाक वाजवून देसाई यांना समर्थन देत होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com