Mira-Bhaindar News : मिरा-भाईंदर महापालिकेत 'घोट्याळाचा' कहर : एक कचरा कुंडी 70 हजारांना अन् डबा 9 लाखांना!

Mira-Bhaindar News : मिरा भाईंदर महापालिकेत साफसफाईसाठी काढण्यात आलेल्या निविदेनुसार एक कचरा कुंडी तब्बल 70 हजार रुपयांना आणि एक कचऱ्याचा डब्बा तब्बल 9 लाख रुपयांना खरेदी केला जाणार आहे.
Mira-Bhaindar Municipal Corporation faces backlash after garbage bins allegedly procured at exorbitant rates, raising corruption concerns.
Mira-Bhaindar Municipal Corporation faces backlash after garbage bins allegedly procured at exorbitant rates, raising corruption concernsSarkarnama
Published on
Updated on

Mira-Bhaindar News : मिरा भाईंदर महापालिकेत घोटाळ्याचा अक्षरशः कहर झाला आहे. साफसफाईसाठी काढण्यात आलेल्या निविदेनुसार एक कचरा कुंडी तब्बल 70 हजार रुपयांना आणि एक कचऱ्याचा डब्बा तब्बल 9 लाख रुपयांना खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे सोन्यापेक्षा कैक पटीने महाग दराने कचऱ्याची कुंडी आणि डबा खरेदी केला जाणार आहे.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी विविध ठिकाणी कचरा कुंड्या उभ्या केल्या आहेत. तसेच सोसायटी, आपार्टमेंट्स आणि सार्वजनिक ठिकाणांहून कचरा कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे कचरा डबे ठेवण्यात आले आहेत. पण आता हे डबे खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन कुंड्या आणि डबे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

यात स्टेनलेस स्टील 3 बिन प्रकाराचे 500, स्टेनलेस स्टील 3 बिन प्रकाराचे 500, ऑटोमॅटिक डबे 21 आणि फायबर डबे 2868 असे एकूण 3889 डब्यांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. यातून 'कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले आहे. एकूण 19 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Mira-Bhaindar Municipal Corporation faces backlash after garbage bins allegedly procured at exorbitant rates, raising corruption concerns.
Tesla Mumbai Showroom: टेस्लानं भारतातलं पहिलं ऑफिस मुंबईतच का थाटलं? महाराष्ट्रासह देशाला काय होणार फायदे? जाणून घ्या सविस्तर

पण कंत्राटदाराने प्रस्तावित केलेले दर पाहता या निविदेमध्ये घोटाळ्याचा वास येत आहे. यातील फायबर डबा 34 हजार, स्टेनलेस स्टील पावडर कोटेड बिन्ससाठी 66 हजार, स्टेनलेस स्टील-अॅल्युमिनियम कोटेड बिन्ससाठी 69 हजार खर्च अपेक्षित आहे. याशिवाय एका ऑटोमॅटिक डब्याची किंमत 9 लाख 34 हजार रुपये आहे.

Mira-Bhaindar Municipal Corporation faces backlash after garbage bins allegedly procured at exorbitant rates, raising corruption concerns.
BJP strategy Mumbai politics : ठाकरे बंधूंमधील एकी कितपत टिकेल? आघाडीचं काय होणार? भाजप कोणता डाव टाकणार?

पण बाजारभावाची या दरांशी तुलना करता येणारा खर्च हा 9 पट अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या निविदेला स्थगिती देऊन त्याची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे. याबाबत आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी माध्यमांना सविस्तर माहिती नसल्याचे सांगतिले असून माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com