Dynastic Politics : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा कहर; पतीला ठाकरेंची उमेदवारी, पत्नीला शिंदेंच्या शिवसेनेचे तिकीट!

Mira-Bhayandar Municipal Elections : मिरा भाईंदरमध्येही पती व पत्नीच्या चार जोड्या निवडणुक लढवणार आहेत. विशेष म्हणजे एकाच घरात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेने तिकीट दिले आहे.
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Shivsena Politics : एका घरात एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्याची परंपरा मिरा भाईंदरमध्येही कायम राहिली आहे. महापालिका निवडणुकीत पती पत्नीच्या चार जोड्या निवडणुक रिंगणात आहेत . यातील एका जोडप्याचे विशेष म्हणजे पतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तर पत्नीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. तर एका ठिकाणी आई व मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.

राजकारणाला घराणेशाहीचा शाप आहे. संधी मिळताच स्वत:सोबतच आपल्या पिढीलाही राजकारणात सक्रीय केले जाते. ही परंपरा मिरा भाईंदरमध्येही कायम राहिली आहे. यंदा पती व पत्नीच्या चार जोड्या निवडणुक लढवणार आहेत.

शिवसेनेच्या नवघर येथील माजी नगरसेविका वंदना पाटील यांच्यासोबत त्यांचे पती विकास पाटील यांनी देखील पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक राजू भोईर हे यावेळी देखील आपल्या पत्नीसह निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत. शिवसेनेकडून माजी नगरसेविका तारा घरत व त्यांचा मुलगा पवन घरत या आई व मुलाच्या जोडीला उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील पेणकर पाडा येथील प्रभाग १६ मधून सोमनाथ पवार व त्यांची पत्नी पूजा पवार यांना प्रभाग १५ मधून उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त एकाच घरात पती पत्नीला दोन वेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अनोखी बाब समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेना व ठाकरेंच्या शिवसेनेतून खरे तर विस्तवही जात नाही. मात्र गोडदेव येथील प्रभाग दहा मध्ये आस्तिक म्हात्रे यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या पत्नी ममता म्हात्रे यांना शिंदेंच्या शिवसेनेने प्रभाग ११ मधून उमेदवारी दिली आहे.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
PCMC News : ठाकरेंच्या माजी आमदाराकडून शरीरसुखाची मागणी अन् महापालिकेत तिकीट नाकारलं; महिला पदाधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

आठ माजी नगरसेवक समोरासमोर

यावेळच्या निवडणुकीत आठ माजी नगरसेवक समोरासमोर निवडणुक लढवत आहेत. त्यामुळे त्यातील किमान चार माजी नगरसेवकांना निवडणुकीनंतर घरी बसावे लागणार आहे. भाईंदर पूर्व येथील प्रभाग ३ मधून भाजपचे माजी नगरसेवक गणेश शेट्टी व शिवसेनेचे दिनेश नलावडे , पेणकर पाडा येथे प्रभाग १५ मध्ये भाजपचे मोहन म्हात्रे व शिवसेनेचे कमलेश भोईर, प्रभाग १६ मध्ये भाजपच्या अनिता पाटील व शिवसेनेचे परशुराम म्हात्रे तसेच भाजपच्या वंदना भावसार व शिवसेनेच्या भावना भोईर या माजी नगरसेविका आमने सामने उभ्या ठाकल्या आहेत.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Kolhapur News : सतेज पाटील जे काही बोलतील त्याला प्रत्युत्तर मिळेलच; खासदार महाडिकांनी दिला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com