

प्रकाश लिमये
Mira-Bhayandar News : मीरा भाईंदर महानगरपालिकेचे महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने सलग पाचव्यांदा महापौर पदी महिला विराजमान होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील महिला राज कायम राहिले आहे.
गुरुवारी (ता.२२) मंत्रालयात महापौर पदासाठी झालेल्या सोडतीत मीरा भाईंदर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. २००२ पासून मिरा भाईंदर महापालिकेत आठ महापौर झाले. त्यातील सहावेळा महापौरपदी महिला बसल्या आहेत तर २०१२ पासून सलग चारवेळा हे पद महिलांकडेच राहिले आहे.
त्यावेळी कॅटलीन परेरा, गीता जैन, डिंपल मेहता व ज्योत्स्ना हसनाळे यांनी हे पद भूषवले आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ९५ पैकी ५१ नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत महिलांचाच वरचष्मा राहणार आहे.
भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवल्यानंतर सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षणकडे लागून राहिले होते. हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असते तर या पदासाठी भाजपमध्ये अॅड रवी व्यास, हसमुख गेहलोत, ध्रुवकिशोर पाटील या वरिष्ठ नगरसेवकांची नावे चर्चेत होती. त्यांचे समर्थक समाजमाध्यमांवर तशी इच्छा देखील व्यक्त करत होते.
मात्र गुरुवारी महापौर पद महिलांसाठी राखीव झाल्याने सर्वांच्या इच्छेवर पाणी फिरले. आता भाजपकडून या पदासाठी कोणाची निवड होते याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपमध्ये सध्या शानु गोहिल, वंदना पाटील, डिंपल मेहता, दीपिका अरोरा, अनिता पाटील, वंदना भावसार या वरिष्ठ नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एखाद्या नावाचा विचार होऊ शकतो अथवा भाजप कडून एखादे धक्कातंत्रही अवलंबले जाऊन नवा चेहेराही दिला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.