Anil Parab: सत्ताधारी घोडेबाजार करण्यात तरबेज! अनिल परब यांनी हॉटेल पॉलिटिक्सचे सांगितले कारण...

MLA Anil Parab ON Maharashtra Legislative Council Elections 2024:"भाजप घोडेबाजार करण्यात हुशार आहे. त्यामुळे आमदारांना एकत्र ठेवण्याची गरज पडते", असा टोला अनिल परब यांनी लगावला.
Anil Parab
Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांचे एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. यातून हॉटेल राजकारणाला बळ मिळालेले आहे. शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब (Anil Parab)यांनी सत्ताधाऱ्यांच्या घोडेबाजारामुळे हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्याची वेळ येते.

विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Legislative Council Elections 2024) उद्या होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून पक्ष आपापल्या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांसह सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी यावरून भाजप सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "भाजप घोडेबाजार करण्यात हुशार आहे. त्यामुळे आमदारांना एकत्र ठेवण्याची गरज पडते", असा टोला अनिल परब यांनी लगावला.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या गोठात चलबिचल सुरु आहे. बेरजेचं राजकारण करता करता वजाबाकी होणार, तर नाही ना, याची धास्ती सर्वच पक्षांना लागले आहे. यातून राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्यावर भर दिला आहे. हॉटेल राजकारणाला वेग आला आहे.

मुंबईतील सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आहे. आमदारांच्या सर्व सोयी सुविधा पक्ष कार्यालयातून हाताळल्या जात आहेत. सत्ताधारी महायुती निवडणुकीत कोणताही दगा फटका करू शकतो, असा विरोधकांचा संशय आहे. यातून भाजपवर शिवसेना ठाकरे पक्ष वारंवार टीका करत आहे. अनिल परब यांनीही भाजप सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर रोष व्यक्त केला.

अनिल परब म्हणाले, "निवडणुकीच्या अगोदर सर्व आमदारांना एकत्र ठेवलं जातं. सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यात हुशार आहे. '50 खोके एकदम ओके' अशी टीका विरोधक सत्ताधाऱ्यांवर नेहमीच करीत आहेत. यातूनच पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत आहे". आमदार किडनॅप होऊ शकतात, काहीही होऊ शकते म्हणूनच आमदारांना एकत्र ठेवण्याची गरज वाटते," असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्या चार आमदारांची गैरहजेरी होती. कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहू शकले नसल्याच्या या चारही आमदारांनी निरोप दिले होते. यात नगर जिल्ह्यातील एका आमदाराचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com