INDIA Mumbai Meet : गद्दारांना किंमत देऊ नका ; विरोधकांवर आदित्य ठाकरे गरजले

Mahayuti Alliance Meet : गुवाहाटी गेले त्याचा खर्च झाला नाही का ? त्यांचा खर्च कोणी केला.
ED Action On Aditya Thackerya Close Person
ED Action On Aditya Thackerya Close PersonSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटावर निशाणा साधणारे पोस्टर आज मुंबईत झळकले. 'मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही' अशा आशयाचा मजकूर बॅनरवर असल्याने चर्चेला उधाण आले आहे. इंडिया बैठकीवर कोट्यवधींचा खर्च होत असल्याची टीका शिंदे गटाकडून होत आहे. बैठकीचे यजमान पद असलेल्या ठाकरे गटाला लक्ष्य करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देत शिंदे गटाला त्यांच्या गुवाहाटी 'दौऱ्याची' आठवण करुन दिली आहे. "गद्दारांना किंमत देऊ नका," असे त्यांनी विरोधकांना सुनावले.

ED Action On Aditya Thackerya Close Person
HC On City Renaming: मोठी बातमी : औरंगाबाद, उस्मानाबाद मूळ नाव कायम; न्यायालयाकडून याचिका निकाली; राज्य सरकारकडून अधिसूचना नाही..

'इंडिया' बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे अज्ञात व्यक्तीने हे बॅनर लागले आहे. आदित्य ठाकरेंनी या बॅनर बोलण्याचे टाळले."बॅनरवर बोलायचे नाही, 'इंडिया'च्या बैठकीवरील खर्चाबाबत म्हणाल तर गुवाहाटी गेले त्याचा खर्च झाला नाही का ? त्यांचा खर्च कोणी केला, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.

ED Action On Aditya Thackerya Close Person
INDIA Mumbai Meet : खर्गेंच्या विश्वासू खासदाराने ठाकरे गटातील नेत्यांसोबत केली पाहणी ; खासदार सावंत, नार्वेकर गुंतले तयारीत..

राम मंदिर विषयात शिवसेनेच्या (ठाकरे गट) योगदानावर विरोधक टीका करीत असतात, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "राम मंदिर विषयात भाजपचे योगदान शून्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हा विषय काढला होता. आम्ही अनेकवेळा अयोध्येला जाऊन आलो आहोत,"

"सुरत,गुवाहाटी, चार्टर्ड विमान आणि 50 खोके आमदारांना दिले, या सर्वांचा खर्च कोणी केलेला, यावर लोकांनी बोलावे," असे त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे. शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन इंडियाच्या मराठमोळ्या जेवणाची ताळीची किंमत साडेचार हजार रुपये आहे, असा दावा केला होता.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com