कामे होत नसल्याने शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे संतापले!

शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) निधी वाटपावरुन नाराज असल्याची चर्चा आहे.
Dilip Lande
Dilip Landesarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) निधी वाटपावरुन नाराज असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये लांडे यांनी चहापानावर बहिष्कार घातल्याची माहिती आहे.

माध्यमांशी बोलताना लांडे म्हणाले, सरकार बद्दले तरी प्रशासन मात्र, तसेच आहे. अधिकारी मुख्यमंत्री, आणि मंत्र्यांना खोटी माहिती देतात. त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचू देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारचे असेल महानगरपालिकेचे असेल सूचना देऊनही कामे होत नाहीत. अधिकाऱ्यांना सांगुनही कामे होत नसतील तर या जिल्हा नियोजन आयोगाच्या बैठकीचा उपयोग काय, असा सवाल लांडे यांनी केला.

Dilip Lande
बाळासाहेबांऐवजी मोदी-शहांच्या नावाने चिन्ह मागा, तुमची ताकद कळेल : मिटकरींनी डिवचले!

कामे होत नसलतील तर बैठकीला येवून फक्त चाहा, नाष्ता करायचा का, असेही ते म्हणाले. आमदारांना नाष्ता देऊन तोंड बंद करायचे. असे असेल तर असले काम माझ्याकडून होणार नाही, असा संताप लांडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता शिंदे गटाचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आमदारांची कामे होत नाहीत, का असा, सवाल विचारला जात आहे.

Dilip Lande
...म्हणूनच उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिले आहे : ढोबळेंनी सांगितले कारण...

दरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये निधी मिळत नाही, आमच्या आमदारांची कामे होत नाहीत, असा आरोप करत शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केले. तसेच भाजप (BJP) सोबत जाऊन सरकार स्थापन केले. मात्र, येथेही आमदारांची कामे होत नसल्याचे आता समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com