...म्हणूनच उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिले आहे : ढोबळेंनी सांगितले कारण...

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विरोधकांच्या गळ्यात पडले : ढोबळेंचा हल्लाबोल
Laxman Dhoble-Uddhav Thackeray
Laxman Dhoble-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विरोधकांशी गळ्यात पडले. हिंदुत्वाच्या प्रखर विचाराबाबत बाळासाहेबांनी कधीही समझोता केला नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, असा शब्दांत माजी मंत्री तथा भाजप नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, त्यांनी घराणेशाहीवरूनही ठाकरे घराण्यावर टीका केली. (Former minister Laxman Dhoble criticizes Uddhav Thackeray)

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ढोबळे यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले की, ज्या दिवशी मी हिंदुत्वाचा विचार सोडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची वेळ येईल. तेव्हा मी शिवसेनेचं दुकान बंद करेल, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. केवळ मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी वडिलांनी आयुष्यभर दिलेला विचार बाजूला सारून मुलानं बाळासाहेबांच्या विरोधकांच्या गळ्यात पडणं, ही गोष्ट बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करण्यासारखी आहे.

Laxman Dhoble-Uddhav Thackeray
मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर बसणार नाही; तुम्हाला बसवेन : राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी स्वतः गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा करून मुख्यमंत्रिपद घेतलं. बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराशी संगनमत करून मुख्यमंत्रिपद घेतले, हेच मुळात गद्दारीचं लक्षण आहे, असेही ढोबळे म्हणाले.

Laxman Dhoble-Uddhav Thackeray
भाजप शहराध्यक्षाची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून संपविले जीवन!

मुख्यमंत्रीपदाच्या नादात ठाकरे यांना ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणं शक्य झालं नाही. सत्ता संपत्तीच्या अंधारात सत्य दिसायला थोडंसा उशीर होतो, म्हणूनच की काय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या हातात आता मशाल दिली आहे, असा टोलही ढोबळेंनी ठाकरेंना लगावला.

Laxman Dhoble-Uddhav Thackeray
ठाकरेंच्या याचिकेविरोधात एकनाथ शिंंदेंचीही दिल्ली हायकोर्टात धाव; ‘आमचं म्हणणं ऐकून घ्या’

मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आपण कधी बोललात, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना करत ढोबळे म्हणाले की, ज्या ज्या वेळेला राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या माणसाला पुत्रप्रेमाने झपाटले. त्या त्या वेळेला या राज्याच्या नेतृत्वाचा ऱ्हास झाला आहे. राजकारणात नात घुसलं की विचार थांबतो. तसेच, भाजपने मला ओढले म्हणणं हा धांदात खोटा आरोप आहे, असेही ढोबळे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com