Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरण; नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना

Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रतेच्या हालचालींना वेग...
Shivsena MLA Disqualification :
Shivsena MLA Disqualification :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. नार्वेकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवू शकतात. अपात्रतेच्या प्रकरणावर आमदारांना नोटीस पाठवली जाऊ शकते. त्याचबरोबर राहुल नार्वेकर आज दिल्लीलाही जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

वरिष्ठ कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या आमदार अपात्रतेच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याने

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Shivsena MLA Disqualification :
Maan Political News : पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही : काँग्रेस नेत्याचा फडणवीसांना सवाल

सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी आमदार अपात्रते प्रकरणातील दिरंगाईबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना चांगलेच सुनावले होते. एक आठवड्यात पुढच्या सुनावणी घ्यावी आणि या प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत देणार आहात, त्यांचेही वेळही सांगावा, अशा कडक शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्य सरकारला आदेश दिला होता.

न्यायालयाने फटकारल्यानंतर नार्वेकरांना यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या प्रमुखांना येत्या एक ते दोन दिवसांत नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षप्रमुखांना आमदार अपात्रतेबाबत आपापली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जाईल. कायदेतज्ज्ञ आणि विधिमंडळाच्या सचिवांशी चर्चा करून नार्वेकरांनी हा निर्णय घेतला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Shivsena MLA Disqualification :
Maharashtra Drought : धक्कादायक : दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली! अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com