MLA Disqualification Result : निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Eknath Shinde : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला.
Mumbai
Mumbai Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करीत शिंदे गटातील 16 आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे. तसेच खरी शिवसेनादेखील एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या या निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतील शिवालय कार्यालयाबाहेर काही कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mumbai
MLA Disqualification Result: आमदार अपात्रतेच्या निकालावेळी नार्वेकरांनी कोणती निरीक्षणं नोंदवली ?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभाध्यक्षांनी जाहीर करीत एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी असल्याचा निकाल दिला. या निर्णायामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

शिंदेंनी कधी केलं होतं बंड?

एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 ला शिवसेनेत बंड केलं होतं. 40 आमदारांना बरोबर घेत ते सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं होतं. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं, तर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. यानुसार आज निकाल लागला.

Edited By- Ganesh Thombare

R...

Mumbai
Shivsena MLA Disqualification Result : उद्धव ठाकरेंना पहिला झटका; 2018 ची घटना नार्वेकरांनी फेटाळली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com