MLA Disqualification Result: आमदार अपात्रतेच्या निकालावेळी नार्वेकरांनी कोणती निरीक्षणं नोंदवली ?

Shivsena : एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना, नार्वेकरांनी नोंदवलं निरीक्षण
Rahul Narvekar :
Rahul Narvekar :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. या निकालाचे वाचन करत असताना नार्वेकरांनी अनेक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवली आहेत. यामध्ये 2018 ला शिवसेनेत पक्षांतर्गत कुठलीही संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती, उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही, पक्षप्रमुखांचे मत अंतिम नाही, असे अनेक निरीक्षणं नार्वेकरांनी नोंदवले आहेत.

निकालातील महत्वाचे मुद्दे कोणते ?

पक्षप्रमुखांचे मत अंतिम नाही :

पक्षप्रमुखाचे मत अंतिम याच्याशी सहमत नाही. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांचे मत पक्षाचे मत असू शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम.

घटनेवर तारीख नाही

ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही.

पदांची रचना घटनेनुसार नाही

- 2018 च्या घटनेनुसार पदांच्या रचनेतून कोणता गट खरा पक्ष हे निश्चित सांगता येणार नाही. ही रचना घटनेनुसार नव्हती.

राजकीय नेतृत्वच

घटनेच्या 10 व्या सुचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्वच बघायचं आहे, असं महत्वाचं निरिक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं.

दोन गट पडल्याची नोंद

21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले. 22 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडल्याचे विधिमंडळ सचिवालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मला.

आयोगाकडील घटनेचा आधार

2018 ची पक्षाची घटना दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल.

बहुमताचा मुद्दा महत्त्वाचा

पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळातील बहुमताचा मुद्दा महत्त्वाचा, असं निरिक्षण नार्वेकरांनी नोंदवलं.

शिंदेंना हटवण्याचा ठाकरेंना नव्हता

उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्याचा अधिकार नव्हता. ते कुणालाही पक्षातून काढू शकत नाहीत. मनात आल्यानंतर कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार त्यांना नाही. पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार देणे लोकशाहीसाठी घातक आहे, असं निरिक्षण नार्वेकरांनी नोंदवलं.

एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना

शिवसेनेत दोन गट पडले, त्यावेळी शिंदे गटाकडे 37 आमदार होते. त्यामुळे त्यांचा गट खरी शिवसेना असून भरत गोगावले यांचा व्हीप वैध आहे, असे निरिक्षण नार्वेकरांनी नोंदवले.

Rahul Narvekar :
Shivsena MLA Disqualification: खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच : राहुल नार्वेकर यांचे मोठे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com