Ganpat Gaikwad News : आमदार गणपत गायकवाड यांनी केला अन्नत्याग?

Ganpat Gaikwad stopped taking food : अटकेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कळवा पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.
MLA Ganpat Gaikwad
MLA Ganpat GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Thane Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली.

अटकेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. तर अटकेनंतर गणपत गायकवाड(Ganpat Gaikwad) यांच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या दुजोरा वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा...

2 फेब्रुवारी रोजी रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गायकवाड हे उपस्थित असताना हा प्रकार घडला. आमदार गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लावल्या. त्या दोघांना तातडीने कल्याण येथील रुग्णालयातून ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले. तातडीने रात्रीच त्या दोघांवर शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्या. महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे सुरुवातीला डॉक्टरांकडून सांगण्यात आले तर राहुल गायक पाटील यांचे प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना अटक करून ठाण्यातील कळवा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर दुपारी पुन्हा त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना अकरा दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.

MLA Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड गोळीबार मोठी अपडेट; CM शिंदेंची पहिली रिअ‍ॅक्शन, म्हणाले...

शिवाय त्या तिघांना पुन्हा कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्या ठिकाणी गायकवाड यांनी अटकेपासून आतापर्यंत एक ही अन्नाचा कण घेतला नसल्याने त्यांनी जणू अन्न त्यागच केला असल्याची चर्चा जोरदार सद्यस्थितीत सुरू आहे. पण, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी अधिकृतरित्या या संदर्भात कोणताही दुजोरा दिलेला नाही .

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com