Jayant Patil : जनतेने आमदारांना पायऱ्यांवर नव्हे, तर विधिमंडळात बसण्यासाठी निवडून दिलयं !

Jayant Patil : विधिमंडळाकडे देश आदर्श म्हणून बघतो त्यामुळे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील मारामारी महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल (बुधवारी) झालेल्या जोरदार राड्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विधिमंडळाच्या (vidhan bhavan)पायऱ्यांवर काल सत्ताधारी आणि विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, एकमेंकाना धक्काबुक्की केली.

राज्यात एकीकडे शेतकरी अडचणीत असताना आमदार म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याच विषयावरआज शेकापचे आमदार जयंत पाटील (jayant patil) यांनी आज विधानपरिषदेत संताप व्यक्त केला.

"विधानभवनाच्या नियमाप्रमाणे, आपण कसं वागयचं, कुठे बसायचं, पायावर पाय ठेवून इथे बसण्याचा अधिकार नाही, प्रेक्षक गॅलरीत बसलेले पत्रकार, लोकांना कसं बसायचं याचे नियम आहेत," असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, "विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर बसण्य़ाचे काम थांबलं पाहिजे, पायऱ्यांवर कोणताही सदस्य बसला नाही पाहिजे. जनतेने आमदारांना पायऱ्यांवर बसण्यासाठी नाही तर विधिमंडळात बसण्यासाठी निवडून दिले आहे. विधिमंडळाकडे देश आदर्श म्हणून बघतो त्यामुळे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील मारामारी महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही,"

Jayant Patil
AAP चे ४० आमदार 'गायब' ; केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी, ऑपरेशन लोटस?

जयंत पाटील म्हणाले, " चॅनेलला देखील शूटिंग करण्यास बंदी घातली पाहिजे. जे पायऱ्यांवर असतात त्यांचे शूटिंग काढू नये असा आपण निर्णय घेतला, आपण आधी पायऱ्यांवर कॅमेरे होते ते बाहेर नेले. येथे शूटिंगवर बंदी घातल्यास कोणाला तिथे आंदोलन करण्याची इच्छाच राहणार नाहीत,"

अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला. ठाकरेंच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

"शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या मनात भीती दिसली. गद्दारी या महाराष्ट्राला पटलेली नाही. जनतेचा कुठेही त्यांना पाठिंबा नाही. एका चांगल्या, प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून ते गेलेत. त्यामुळेच त्यांना पायऱ्यांवर अशी घोषणाबाजी करावी लागत आहे. आज ज्यांना पायऱ्यांवर उभे केले होते त्यांची मला कीव येत आहे. त्यांना मंत्रिपदासाठी माझ्याविरोधात बोलावं लागतय. बंडखोरांनी जी काही निदर्शने झाली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले," असे ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com