शिंदे गटातील आमदाराचे कार्यालय फोडणाऱ्या २३ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

शिंदे यांच्या गटात कुडाळकर गेल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी कुडाळकर यांच्या कुर्ला येथील कार्यालयावर हल्ला चढवला होता.
Mangesh Kudalkar,  Eknath Shinde
Mangesh Kudalkar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे (ShivSena) निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड शिवसैनिकांनी केली होती. याप्रकरणी कुडाळकर यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी शिवसैनिकांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. (Mangesh Kudalkar news update)

एकनाथ शिंदे यांच्या गटात कुडाळकर गेल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी कुडाळकर यांच्या कुर्ला येथील कार्यालयावर हल्ला चढवला होता. आक्रमक शिवसैनिकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या बॅनर्सची तोडफोड केली होती.या तोडफोडीचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

मंगेश कुडाळकर यांनी आपल्या नावाच्या फलकाची मोडतोड करणाऱ्याविरोधात पोलिसाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी २३ शिवसैनिकांविरोधात नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळकर यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा राग अनावर झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.

Mangesh Kudalkar,  Eknath Shinde
ठाकरेंच्या तीन निर्णयांना शिंदे सरकारकडून स्थगिती ; नामांतराबाबत नव्यानं निर्णय घेणार

संतप्त शिवसैनिकांनी कुडाळकर यांच्या कुर्ला येथील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. कुडाळकर यांचे पोस्टर फाडले होते. या प्रकरणी कुडाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेहरूनगर पोलिसांनी २३ शिवसैनिकांविरोधात १४१,१४३,१४९,४२७ भादवी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का दिला आहे. शीतल म्हात्रे या एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. त्यानंतर त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. राज्यभरातील अनेक शिवसेना खासदार, आमदार यांच्यासह महापालिका नगरसेवकांचा शिंदे गटाला मिळाला पाठिंबा देखील वाढत आहे. यामुळे शिंदे गटाची ताकद वाढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com