Maratha OBC Reservation Issue : 'आधी शूद्रत्व स्वीकारा, मगच आरक्षण मागा..!'

OBC Candle March : छगन भुजबळांच्या समर्थनार्थ चांदवडला कँडल मार्च काढून ओबीसी समाज गरजला...
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik news : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लाऊ नका. असा प्रकार सरकारने केल्यास ओबीसी (OBC) समाज सहन करणार नाही, असा इशारा महात्मा फुले समता परिषदेतर्फे सोमवारी (1 जानेवारी) देण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी समाजाने कँडल मार्च (Candle March) काढला. कँडल मार्चमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पाठिंबा देण्यात आला. या शिवाय महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे आणि श्री. कर्डक यांच्या उपस्थितीत भुजबळांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.

Chhagan Bhujbal
Gopichand Padalkar : पडळकरांना ओबीसी समाजाची चिंता; भीतीपोटीच राज्यभरामध्ये मेळावे...

शहरात कँडल मार्च काढल्यानंतर सभा घेण्यात आली. यावेळी सरकारला सक्त इशारा देण्यात आला. 'ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिल्यास राज्य सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत जागरूक राहावे', अशी तंबी सरकारला देण्यात आली.

यावेळी समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक यांनी खडे बोल सुनावले. 'मराठा समाजाने आरक्षण मागावे. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी समाजात मराठा आरक्षणाने घुसखोरी केल्यास तो अन्य जातींवर अन्याय ठरेल. मराठा समाजाने प्रथम शूद्रत्व स्वीकारावे, नंतरच ओबीसी गटातून आरक्षणाची मागणी करावी', या कडक शब्दांत कर्डक यांनी ओबीसींच्या भावना व्यक्त केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भुजबळांना विरोध करून कोणीही त्यांची नाहक बदनामी करू नये. त्यांची ओबीसी संघर्षयोद्धा ही ओळख कोणीही पुसू शकत नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास समता परिषद त्याला जशास तसे उत्तर देईल, असा इशारा राज्य समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिला. शिवाय आमचा लढा कुणाच्याही विरोधात नसून फक्त ओबीसींच्या संवैधानिक हक्कासाठी आहे, असेही खैरे यांनी बजावले.

यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, भूषण गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, विविध कार्यकारी सोसायटीचीचे चेअरमन गोकुळ गांगुर्डे, सरपंच मीरा संजय गांगुर्डे, अण्णा गांगुर्डे, अशोक निकम, शिवाजी निकम, शरद गांगुर्डे, शरद जुंद्रे यांसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)

Chhagan Bhujbal
Maratha Reservation Issue : ‘जरांगेंनी समजून घ्यावे’; विखे पाटलांनी सरकारची बाजू मांडली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com