Rohit Pawar : रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर 'ईडी'ची छापेमारी

Ed Raid : मुंबईसह सहा ठिकाणी कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती...
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Agro : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाड टाकल्याचे समजते. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) ही छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि साखर आयुक्तांच्या कारवाईनंतर आता थेट ईडीची धाड पडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर विरोधकांवर आक्रमणाची जबाबदारी रोहित पवारांनी (Rohit Pawar) आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यानंतर ईडीने (ED Raid) ही कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुंबईसह सहा ठिकाणी ईडीकडून तपास केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, एकीकडे ईडीची छापेमारी सुरू असताना रोहित पवारानी सूचक ट्विट केले आहे. ‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा... ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला... अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Rohit Pawar
ED team attacked : रेड टाकायला गेलेल्या ‘ईडी’च्या टीमवर हल्ला, गाडी फोडली; अधिकारी गेले पळून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com