Rohit Pawar Protest: न्याय मिळत नाही, तोपर्यंत हलणार नाही ; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना इशारा

Maharashtra Monsoon Session: एमआयडीचा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही, असा आरोप रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केला आहे.
Maharashtra Monsoon Session 2023 Live
Maharashtra Monsoon Session 2023 Live Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Pavsali Adhiveshan 2023 Live: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यास आज प्रारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाच्या प्रांगणातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर आज सकाळीच आंदोलन सुरु केले आहे. हातात फलक घेत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. आता बघूनच घेतो, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Maharashtra Monsoon Session 2023 Live
Pune Crime : ACP गायकवाड यांनी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या; स्वत:वरही गोळी झाडली..

माझ्या मतदारसंघातील एमआयडीचा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही, असा आरोप रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केला आहे. दबावाच्या राजकारणाला सरकार बळी पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. "पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा...जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही," असा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.

विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात फलक घेत त्यांनी एमआयडीसीच्या मागणीसाठी सरकारचा निषेध केला. या एमआयडीसीला मंजूरी मिळावी म्हणून आमदार रोहित पवार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

काय प्रकरण आहे

  • रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीसाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली होती.

  • पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भू-निवड समितीने 18 नोव्हेंबर 2021 रोजी पाहणी केली होती. त्यानंतर या क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण जानेवारी 2022 मध्ये करण्यात आले.

  • 14 जुलै 2022 रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील 458.72 हेक्टर क्षेत्राला तत्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, पुढे याची अधिसूचना निघाली नाही.

  • रोहित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात 23 डिसेंबर 2022 रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे याला सरकारने तत्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली होती. त्यानंतरही पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com