मुंबई : ठाण्यात काल झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ''मशिदीवरील भोंगे खाली उतरवा,' या मागणीचा पुर्नउच्चार राज ठाकरे यांनी सभेत केला.
राज ठाकरे यांनी या सभेत फटकेबाजी करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्नधान्यपुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदींवर राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरेंच्या भाषणावर राष्ट्रवादीचे नेते, युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी भाष्य केलं आहे. फेसबूक पोस्ट करीत राज ठाकरेंना त्यांनी सुनावलं आहे.
''मराठी अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान, युवकांचा रोजगार हे मराठी मनातील मुद्दे आहेत. याच मुद्द्यांना घेऊन कधीही फायदा तोट्याचा विचार न करता मराठी मनाची भूमिका प्रखरपणे मांडणारे राज ठाकरे साहेब आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत याचं नक्कीच दुःख आहे,'' असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी अस्मिता, मराठी स्वाभीमान या मुद्यांवरुन स्थापन झालेल्या मनसेला रोहित पवारांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून सल्ला दिला आहे. ''काही कारणास्तव भूमिका या तात्पुरत्या बदलाव्या लागल्या असतीलही, पण मराठी मनातील अस्मितेची, स्नेहाची भावना मात्र कधीही बदलणार नाही, ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राला दिल्लीपुढं झुकवण्याचे असंख्य प्रयत्न झाले व होत आहेत, परंतु स्वाभिमानी बाण्याचा महाराष्ट्र ना कधी झुकला.. ना कधी झुकणार,'' असे पवारांनी सांगितले,
रोहित पवार म्हणतात, 'तोडा-फोडा आणि राज्य करा' या भाजपच्या ब्रिटिशकालीन रणनीतीला मराठी माणूस ओळखून असल्याने द्वेषमूलक विचारांच्या रणनीतीला महाराष्ट्राचं मराठी मन नक्कीच हद्दपार करेल, हा विश्वास आहे,''
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज ठाकरें यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ''राज ठाकरे व्यक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही,''
राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या प्रत्येक टीकेचं उत्तर पवारांनी या पत्रकार परिषदेत दिले. ''आता जे वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे, त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का द्यायचा हा प्रयत्न आहे. राज्याची शांतता संकटात आहे. लोकांनी बळी पडू नये,'' असे पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.