मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माझी भेट झाली नाही. चालता चालता ‘हाय हॅलो’ केले. आम्ही दोघांनी एकमेकांना हसून नमस्कार केला. राऊतांनी मला ‘कसं काय चाललंय’ असे विचारलं. त्यावर मी त्यांना चांगलं चाललंय, असं उत्तर दिलं, असे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले. (MLA Sanjay Shirsat meet MP Sanjay Raut)
आमदार संजय शिरसाट आणि खासदार संजय राऊत यांची आज विधानभवनात भेट झाल्याची चर्चा रंगली होती. या भेटीसंदर्भात बोलताना आमदार शिरसाट म्हणाले की, आमची भेट झाली नाही. फक्त आमच्या गाड्या बरोबरीने आल्या होत्या. त्यावेळी आमच्यात नमस्कार, चमत्कार आणि ख्यालीखुशालीसंदर्भात बोलणी झाली. बाकी इतर कोणतीही चर्चा आमच्यात झाली नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
आमदार शिरसाट हे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी तीव्र इच्छूक आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांचे नाव पक्के झाले होते. मात्र, अब्दुल सत्तार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना थांबवले होते. त्यामुळे शिरसाट काही काळ नाराजही झाले होते. तसेच, अब्दुल सत्तार यांंनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावूनही ते सिल्लोडला गेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा ठराविक काळाने हेाते असते, त्यामुळे राऊत यांच्यासोबत झालेल्या साध्या ‘हाय हॅलो’चीही चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत आमदार संजय शिरसाट यांनी आज गौप्यस्फोट केला. नार्वेकर हे विधानसभेत आले नव्हते. ते प्रेक्षक गॅलरीत आले हेाते. बहुतके सभागृहात येण्याचा मार्ग शोधत असतील, असे विधानही शिरसाट यांनी केले. ते एकतर शिवसेनेकडून अथवा भारतीय जनता पक्षाकडून ते विधानमंडळात येऊ शकतात, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.