Zeeshan Siddique : गृहमंत्री फडणवीसांची भेट, काही क्षणातच झिशान सिद्दिकींची 'ती' पोस्ट, नेमकं काय सुचवायचंय..?

Zeeshan Siddique Meet Devendra Fadnavis: आमदार झिशान सिद्दिकी यांनी वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर दुसरी सूचक पोस्ट 'एक्स' खात्यावर पोस्ट केली आहे.
Zeeshan Siddique
Zeeshan Siddique Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सूचक पोस्ट शेअर करत आहेत.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांनी 'न्याय हवा', अशी पोस्ट केली होती. त्यानंतर आता, 'लपलेले सर्व काही सुस्त नाही अन् दिसते ते सर्वच बोलत नाही', असा मजकूर एक्स माध्यमांवर शेअर केला आहे.

आमदार झिशान सिद्दिकी यांनी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर न्याय पाहिजे, असे 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली होती. यानंतर लगेच त्यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री झिशान सिद्दिकी, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीत झिशान सिद्दिकी यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा झाली, याचा तपशील समोर आलेला नाही.

Zeeshan Siddique
Amit Thackeray Breaking News : अमित ठाकरेंची उमेदवारी 'फायनल', मतदारसंघही ठरला ? उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा..?

अजित पवार यांनी मात्र, झिशान सिद्दिकी यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे सूचक विधान केले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर झिशान यांनी आज पुन्हा 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. Not all that is hidden sleeps, Nor all that is visible speaks (लपलेले सर्व काही सुस्त नाही अन् दिसते ते सर्वच बोलत नाही), अशी पोस्ट ही आहे. झिशान सिद्दिकी यांची ही पोस्ट बरंच काही सांगून जाते. सूचक रोख दर्शवतो. त्यामुळे झिशान सिद्दिकी यांची ही पोस्ट लक्षवेधी ठरली आहे.

Zeeshan Siddique
Mumbai Politics : मुंबईचे किंग एकनाथ शिंदेच? महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

पाच जणांना अटक

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेत आहे. लॉरेन्स बिष्णोई हा गुजरात 'एटीएस'च्या ताब्यात आहे. मुंबई पोलिस त्याच्याकडे चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तिघांकडून तीन पिस्तूल, 28 काडतूस आणि मिर्ची-स्प्रे जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे कुर्ला इथं भाड्याने खोली घेऊन राहत होते.

सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

बाबा सिद्दिकी यांची हत्या कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अभिनेता सलमान खानचे जवळचे मित्र म्हणून टार्गेट करण्यात आल्याची चर्चा आहे. तशी पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. तत्पूर्वी सलमान खानच्या घरावर लॉरेन्स बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. याच कड्या मुंबई पोलिस जुळवत आहेत. दरम्यान, सलमना खान याच्या सुरक्ष व्यवस्थेत वाढ केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com