MNS alligations on NCP
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अचानक स्थगित झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. असे असतानाच आता मनेसकडून (MNS) एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमुळे पुन्हा तर्कविर्क काढले जाऊ लागले आहेत.
राज ठाकरेंचे सचिव आणि मनसे नेते सचिन मोरे यांनी त्यांच्या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मोरेंनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे. या ट्वीटमधून मनसेने अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधत राज यांच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला आहे.
या फोटोत ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख नसला तरी मागे असलेल्या बॅनरवरुन मावळमध्ये झालेल्या कुस्तीच्या कार्यक्रमातील हा फोटो असल्याचं दिसत आहे. दरम्यान, मनसे नेते प्रकाश महाजन यांनीदेखील यापुर्वीच शरद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेने शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.