MNS : पुण्यात उद्या 'राजसभा' ; मनसेकडून दुसरा टीझर प्रदर्शित

पुण्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसेकडून (mns) या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (ता.२२) पुण्यात जाहीर सभा होत आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांचा अयोद्धा दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) उद्या पुण्यात काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसेकडून (mns) या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सकाळी दहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुण्यातील सभेसाठी पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.

MNS Chief Raj Thackeray
लोणीकरांची जीभ घसरली ; म्हणाले, हे सरकार बेमान औलादीचं, मंत्र्यांना समुद्रात बुडवा !

गुढी पाडवा मेळावा, ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादेतील सभेचा राज ठाकरे यांच्या भाषणाचा काही भाग या दुसऱ्या टीझरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच राज यांनी पुण्यात हनुमान चालिसाचे पठण केले होते, त्याची देखील क्लिप टीझरमध्ये टाकण्यात आली आहे. उद्या पुण्यात हिंदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा,असे टीझरच्या शेवटी दाखवण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी आज संत साहित्याचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. मराठीतील संत साहित्याची परंपरा तसंच महाराष्ट्राचा इतिहास यांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला, याचं कारणही राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत सांगणार आहेत. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा स्थगित केल्यावरून राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाकरेंना डिवचलं आहे. "आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती.." असं म्हणत राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

MNS Chief Raj Thackeray
शिवाजी महाराजांचा लाल महल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नव्हे !

राऊत म्हणाले, "अयोध्या दौरा रद्द करण्यामागे काय अडचणी आहेत ते माहित नाही. पण, भाजपने असे का करावे? भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना वापरून घेत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरं होईल. आपण वापरले जातोय हे काही लोकांना उशिरा कळतं. कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतंय,"

"राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती," असेही संजय राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com